आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई : अजित पवार यांच्या गटासाेबत स्थापन केलेले सत्ता टिकवण्यात अपयशी ठरल्यानंतर व मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना भाजप पक्षांतर्गत विरोधकांच्या नाराजीचा सामना करावा लागेल.
मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी पक्षाच्या नेत्यांपेक्षा बाहेरून आलेल्या नेत्यांना अधिक महत्त्व दिले होते. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून फडणवीस यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही खडसे यांना त्यांच्या हक्काच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून तिकीटही दिले नव्हते. यावर खडसे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना तिकीट दिले. मात्र, त्यांचाही पराभव झाला. उलट जळगावात गिरीश महाजनांच्या नेतृत्वाला बळ दिले.मुलीच्या पराभवामागेही फडणवीस यांचाच हात असल्याचा संशय खडसे यांना आहे. मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणाऱ्या पंकजा मुंडे यांचाही परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला. आपल्या पराभवासाठी फडणवीस यांनीच हातभार लावल्याचा संशय पंकजा समर्थकांना अाहे. माजी मंत्री विनाेद तावडे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापण्यातही फडणवीस यांचाच हात असल्याचे सांगण्यात येतेे. बावनकुळे गडकरी यांचे समर्थक मानले जातात. राज्यातील हे सर्व नाराज नेते लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गटामध्ये दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. सूत्रांच्या माहितीनुसार, या नाराज नेत्यांचे नेतृत्व सुधीर मुनगंटीवार करू शकतील. फडणवीस यांना विदर्भातूनही विराेध वाढू शकताे.
केंद्रीय नेतृत्वही फडणवीस यांच्यावर नाराज
अमित शहा यांचे निकटवर्तीय चंद्रकांत पाटील यांच्या हाती आता पक्षाचे नेतृत्व येण्याची शक्यता आहे. याच वेळी फडणवीस यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात येऊ शकते. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसच्या असफलतेनंतर केंद्रीय नेतृत्वदेखील फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय नेत्यांनीदेखील चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांना संधी देण्यासंबंधी िवचार सुरू केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.