आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धानोऱ्यात इंडी कॅशचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न, चार लाखाची रोकड सुरक्षित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धानोरा- बऱ्हार्णपुर-अंकलेश्वर या राज्यमहामार्गाला लागुन असलेल्या जळगाव रस्त्यावरील बसस्थानक शेजारी असलेले टाटा इंडी कॅशचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांकडून झाला आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून काही प्रमाणात नासधुसही केली आहे. एटीएम फोडूनही एटीएममधील रोकड सुरक्षित आहे. गावात असलेल्या दोन्ही एटीएमवर कुठल्याच प्रकारे सुरक्षा नसल्याने आणि अडावद पोलिस ठाण्याकडीला गस्त बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी डल्ला मारला. 


याबाबत सविस्तर असे की, गावातील जळगाव रस्त्यावर ग्रामपंचायत शॉपींग काँप्लेक्स आहे. यात टाटा इंडी कॅश एटीएम आहे. 28 जुलैच्या रात्री चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले, वायर कापले, तसेच काही प्रमाणात नासधुस केलेली आहे. यावेळी चोरटे एटीएम पूर्णपणे फोडू शकले नाहीत, त्यामुळे आत असलेली रक्कम सुरक्षित आहे. एटीएम शेजारी नवल महाजन, भावड्या पाटील यांचे चहाचे दुकान आहे. आज(29 जुलै) सकाळी पाच वाजेच्या सुमारास झाडू मारत असतांना त्यांना एटीएम फोडलेले आढळले. त्यांनी तात्काळ स्थानिक पोलिस पाटील दिनेश पाटील यांना कळवले. घटनास्थळावरुन जाऊन पोलिस पाटील यांनी तात्काळ अडावद पोलिस ठाण्याला माहीती दिली. सकाळी साडेआठ वाजेला घटनास्थळी अडावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे, उपनिरक्षक यादव भदाणे, हवालदार योगेश कोळंबे, इस्माईल शेख, पोलिस पाटील दिनेश पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर अकराच्या सुमारास चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी सौरभकुमार अग्रवाल यांनी भेट दिली. 

 

दोन्ही एटिएम सुरक्षेविना

बर्हाणपुर-अंकलेश्वर या मार्गावरील धानोरा गाव महत्वपूर्ण गाव म्हणुन ओळख आहे. गावात एक सेंट्रल बँकेचे तर जळगाव रस्त्यावर टाटा इंडी कॅश असे दोन एटीएम आहेत. या दोन्ही एटीएमवर सुरक्षारक्षक नाहीत, वीजपुरवठा राहत नाही, इतर सोईसुविधांवर दुर्लक्ष केलेले आहे. दिड वर्षांपुर्वी सेंट्रल बँकेचे एटीएम फोडून चार लाख रुपये लांबवले होते, तरीही बँकेने कुठलीही दक्षता घेतलेली नाही. दोन्ही एटीएमवर सुरक्षारक्षक नेमण्याची ग्रामस्थांकडून मागणी झालेली आहे.


चार लाखाची रोकड सुरक्षित

इंडी कॅश एटीएममध्ये 26 जुलै रोजी चार लाख रुपये भरले होते. जर पूर्ण एटीएम फुटले असते तर चार लाख रुपये चोरीस गेले असते.ग्रामपंचायतच्या बांधलेल्या गाळ्यात चार क्रमांकाच्या खोलीत टाटा इंडीकॅशचे एटिएम आहे. एटीएममध्ये गेल्यावर अंधारच असतो, लाईट नाही, हवा नाही, एसी नाही, सुरक्षारक्षक नाही, एटीएमने पैसे काढले तर दोनच हजार रुपये निघतात. अशा अनेक समस्या आहेत. इंडीकॅश कर्मचारी कधी येतात पैसे टाकुन जातात कुणालाच काहीच माहीत नसते. यामुळे गावात असलेल्या या एटीएमचा नेमका वाली कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

 


दिड वर्षांपूर्वी चार लाख गेले, आता चार लाख वाचले

दिड वर्षांपूर्वी 14 जानेवारी 2018 च्या मध्यरात्री सेंट्रल बँकेचे एटीएम गॅस कटरने कापुन चार लाख रुपये लांबवले होते. तर 28 जुलैला इंडीकॅशचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सुदैवाने यातील 4 लाख रुपयांची रोकड सुरक्षित राहीली. 

 

अडावद पोलिसांची गस्त बंद

अडावद पोलिस ठाण्याकडून दिवस-रात्रची गस्त कधी बंद तर कधी सुरु या स्वरुपात आहे. यामुळेच चोरटे डोके वर काढून चोरी करण्याचे धाडस करत आहेत. सध्या धानोरा परीसरात देवगाव, पारगाव, मितावली, पुनगाव या शिवारातुन बैल, म्हशी चोरीच्या घटना, भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ झालेली असल्यामुळे अडावद पोलिसांनी पुन्हा सतत व सतर्क गस्त सुरु करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

बातम्या आणखी आहेत...