आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षेत अपयश; दिव्यांगाने सुरू केला चहाचा गाडा, रोज विकला जातो ७०० कप चहा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवीण देशपांडे

परभणी - पदवीनंतर स्पर्धा परीक्षा दिल्या. प्री परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मेन परीक्षेत अपयश पदरात पडलेल्या गुरुसिंह या युवकाने मनाचे खच्चीकरण न करता थेट परभणीत चहाचा गाडा सुुरू केला. अन् त्याच्या गावरान गुळाचा चहा आज लोकप्रिय ठरला.

येथील काद्राबाद प्लॉट भागातील गुरूसिंह चंदेल या दिव्यांग युवकाने पदवी पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. विशेषतः त्यासाठी औरंगाबाद गाठून क्लासेस जॉइन केले. स्थिती जेमतेम असतानाही मोठ्या मेहनतीने प्री परीक्षा दिली. त्यात त्याने बाजी मारली. दुर्दैवाने मेन परीक्षेत त्यास अपयश पदरी पडले. परंतु गुरुसिंह खचला नाही. आपण दिव्यांग आहोत, काय करावे वगैरे विचारसुद्धा मनी डोकावला नाही. त्याने थेट मूळ गाव म्हणजे परभणी गाठले व भांडवल उभे करीत चहाचा गाडा सुरू केला.

स्टेशन रस्त्यावरील जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर त्याने गाडा उभा करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्या गाड्याकडे आसपासच्या व्यापाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले. ते यासाठी की, गुरुसिंह याने मोठ्या कल्पकतेने चहात साखरेचा वापर करण्याऐवजी गावरान गुळाचा उपयोग सुरू केला अन् तोच त्याचा फंडा लोकप्रियतेसाठी कारणीभूत ठरला. गुरुसिंह याने जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून व्यवसायासाठी दीड लाखाचे कर्ज काढले. सोबत तिघा तरुणांना घेतले. कौटुंबिक व्यवसाय हा हॉटेलिंगचाच. त्यामुळेच त्याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून या व्यवसायात पदार्पण केले आणि तिघांच्या साहाय्याने जोमाने व्यवसाय सुरू केला. आज गुरुसिंह दररोज ७०० ते ८०० कप चहा विकतो.चहाचे शौकीन तृप्त : 


चहाच्या गाड्यावर लालभडक फलकावर गुरू टी हाऊस. गावरान गुळाचा चहा हा फलक रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने कुतूहलाचा विषय ठरला आहे. या फलकाकडे पाहूनच गुरूच्या चहा टपरीवर नागरिक विसावू लागले आहेत. गावरान गुळाचा चहा ओठाला लावताच चहाचे शौकीन वा क्या बात है, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत तृप्त होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...