आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लेस्टोअरवर सात बँकांचे बनावट अॅप, खात्यातून आणि क्रेडिट कार्डमधून डेटा चोरी होण्याचा धोका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गूगल प्लेस्टोअरवर एसबीआय, आयसीआयसीआय, अॅक्सिस, इंडियन ओव्हरसिज, बँक ऑफ बडोदा, यस आणि सिटी बँकेचे बनावट अॅप्स आहेत. यातून हजाराे ग्राहकांच्या खात्यातून आणि क्रेडिट कार्डमधून डेटा चोरी होण्याचा धोका आहे. आयटी सेक्युरिटी कंपनी सोफोस लॅब्जने एका अहवालात हा दावा केला. यानुसार, हे सर्व अॅप्स बँकांच्या मूळ अॅप्सशी मिळते-जुळते असून ग्राहक यातील फरक ओळखू शकत नाहीत. दरम्यान, या बनावट अॅप्सबाबत माहिती नसल्याचे बँकांचे म्हणणे आहे. शिवाय सोफोस लॅब्जला या अहवालातून आपल्या बँकांची नावे काढून टाकण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...