आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंकलेखन परीक्षेत आढळला तोतया विद्यार्थी, टाईपरायटिंग इन्स्टीट्युट संचालकावर कारवाईची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्यात परीक्षा परिषद पुणे मार्फत घेतल्या जाणाऱ्या शासकिय टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेदरम्यान बुधवारी मिलिंद मल्टी पर्पज हायस्कूल या केंद्रावर शिक्षणाधिकाऱ्यांना एक डमी विद्यार्थी आढळून आला. याबाबत विद्यार्थ्याने प्रशिक्षण घेतलेल्या टाइपिंग इंन्स्टीट्युटच्या संचालकांवर तसेच विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे असे पत्र छावणी पोलिस स्टेशन येथील पोलिस निरीक्षकांना शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहे.


सध्या परीक्षा परिषद पुणे मार्फत घेतल्या जाणाऱ्या शासकिय टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा सुरू आहेत. जिल्ह्यातील विविध सात केंद्रावर सकाळी 9 वाजेपासून परीक्षा घेतल्या जात आहे. शहरातील केंद्र क्रमांक 5102 मिलींद मल्टी पर्पज हायस्कूल, नागसेनवन या केंद्रावर शिक्षणाधिकारी बी.बी. चव्हाण यांनी सकाळी 9 ते 11.30 दरम्यान भेट दिली असता. बैठक क्रमांक 5102110075 या क्रमांकाचा विद्यार्थी रामनाथ गावंडे परीक्षेस प्रविष्ठ झाला होता. सदर विद्यार्थ्याच्या शेजारी बैठक क्रमांक 115 असलेला विद्यार्थी गौरव मेश्राम हा ही प्रविष्ठ झालेला होता. हॉल क्रमांक 2 मध्ये जिल्ह्याचा परीक्षा म्हणून शिक्षणाधिकारी भेट देत असतांना शिक्षण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले की रामनाथ गावंडे या विद्यार्थ्याचा पेपर गौरव मेश्राम या विद्यार्थ्याने सोडवून दिला आहे. 

हे दोन्ही विद्यार्थी नेहा टाईपराईटिंग इन्स्टीट्युटमार्फत परीक्षेस बसलेले होते. सदर इन्स्टीट्युटचे संचालक विजय मेश्राम हे आहेत. रामनाथ गावंडे या विद्यार्थ्याचा पेपर गौरव मेश्राम या विद्यार्थ्याने सोडवुन दिलेला आहे. असा माफीनामा दोन्ही विद्यार्थी व इन्स्टीट्युटचे संचालक यांच्याकडून घेऊन गुन्हा घडल्याचे कबुल केले. त्यामुळे वरील दोन्ही विद्यार्थी व टाईपरायटिंगचे संचालक यांच्यावर महाराष्ट्र राज्य परीक्षा अधिनियम 1982 नुसार कार्यवाही करावी, असे पत्र छावणी पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आले.