Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | fake EVM investigation in nagar

इव्हीएम बनावट आदेशाबाबत पाेलिसांना मिळेनात धागेदोरे

प्रतिनिधी | Update - Aug 19, 2018, 12:06 PM IST

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) घोटाळ्याबाबत जिल्हा प्रशासनाला आलेल्या बनावट आदेश प्रकरणात पोलिसांना अद्याप धागेदोरे

  • fake EVM investigation in nagar

    नगर - इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) घोटाळ्याबाबत जिल्हा प्रशासनाला आलेल्या बनावट आदेश प्रकरणात पोलिसांना अद्याप धागेदोरे मिळालेले नाहीत. इव्हीएमच्या गैरवापरामुळे आपले राष्ट्र व लोकशाही धोक्यात आली अाहे. या घोटाळ्याबाबतचा परिणामकारक अहवाल ३० दिवसांत सादर करा, असे या बनावट आदेशात म्हटले आहे.

    प्रशासनाला तीन महिन्यांपूर्वी हा बनावट आदेश प्राप्त झाला होता. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने प्राधिकृत केलेले नायब तहसीलदार संजय परदेशी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी फसवणूक व बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाच दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु या प्रकरणाच्या तपासाला अद्याप गती मिळालेली नाही. देशातील नागरिकांमध्ये इव्हीएम घोटाळ्याबाबत खूप चर्चा सुरू आहे. इव्हीएम मशीनमध्ये दोष असेल तेथे गोपनीय पोलिस चौकशी नेमूण या घोटाळ्याबाबतची चौकशी करावी. जर इव्हीएममध्ये घोटाळा होण्याची शक्यता असेल, तर पुढील आगामी २०१९ ची लोकसभा निवडणूक व इव्हीएमच्या घोटाळ्याबाबत परिणामकारक अहवाल ३० दिवसांच्या आत सादर करावा, असे या बनावट आदेशात म्हटलेले आहे.

Trending