फेसबुकच्या माध्यमातून 75 / फेसबुकच्या माध्यमातून 75 पेक्षा जास्त महिलांसोबत मैत्री, सर्वांना दिले फक्त एक वचन

Oct 19,2018 04:08:00 PM IST

अहमदाबाद | राजकोट येथील एक तरुण काही काळापुर्वी लंडनला गेला होता. त्याने आपल्या रुम पार्टनरच्या फोटोंचा दुरुपयोग करुन खोटे नाव टाकून फेसबुक आणि इतर सोशल साइट्वर आपली प्रोफाइल निर्माण केली. आपण फॉरेनर असल्याचे तो म्हणाला. यानंतर युवकाने महिलांना लग्न करण्याचे आमिष दाखवून 75 पेक्षा जास्त महिलांची फसवणुक केली. या प्रकरणी सायबर क्राइममध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी राजकोट येथून आरोपीला अटक केली आहे.


महिलांना लग्नासाठी करतो प्रपोज
या प्रकरणी माहिती देताना एसीपी जे एस गेडम यांनी सांगितले की, लंडनमध्ये राहणाला मूळ अहमदाबादच्या एका तरुणाने सायबर क्राइममध्ये तक्रार दाखल केली आहे. एक अज्ञात व्यक्ती त्याच्या फोटोचा दुरुपयोग करत असल्याचे त्याने सांगितले. त्याने प्रशांत पंड्या नावाचे फेसबुक मॅसेंजर आणि व्हॉट्सएपमध्ये अकाउंट ओपन केले आहे. तो या नावाने महिलांसोबत बोलतो. तो लंडनमध्ये राहतो आणि चांगली कमाई करत असल्याचे या महिलांना सांगत आहे. तसेच तो सर्वांना लग्नासाठी प्रपोजही करतोय. या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला. तेव्हा कळाले की, हे एक फेक अकाउंट आहे. हे लंडनमध्ये नाही तर राजकोटमध्ये न्यू महावीर नगर येथे राहणारा बीपीन कुमार शांतीलाल मेहता(35) याचे आहे. यानंतर पोलिसांनी राजकोट येथून बीपीन महेताला अटक केली.

पोलिसांना सांगितली सर्व कहाणी
अटकेनंतर आरोपीची विचारपुस केल्यानंतर त्याने सांगितले की, 2012 मध्ये तो लंडनमध्ये गेला होता. येथे तो तक्रारदार राजेंद्र दलालसोबत एकाच खोलीत पीजीमध्ये राहत होता. या दरम्यान त्यांची मैत्री झाली आणि त्याने राजेंद्रच्या कुटूबाची माहिती मिळवली. याच्या आधारावर आरोपी 2016 मध्ये पुन्हा भारतात परतला. यानंतर त्याने मित्राच्या फेसबुकवरुन त्याचे फोटो घेतले.

मान्य केले: व्हॉट्सअपच्या माध्यमातून महिलांसोबत मैत्री करुन त्यांचे वयक्तिक फोटो जमा करायचो


आरोपी बीपीन मेहताने शादी डॉट कॉममध्ये फेक प्रोफाइलच्या माध्यमातून जवळपास 50 महिलांसोबत संपर्क केला. या दरम्यान त्यांच्यासोबत चॅटिंग करुन त्यांचे वयक्तिक फोटो जमा केले. यासोबतच या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करुन इतर 25 महिलांसोबत व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्कात होता.

आरोपी एका वीमा कंपनीत अकाउंटेट आहे
आरोपी बीपीन महेता हा एक खाजगी बीमा कंपनीत अकाउंटेट आहे. लंडनमध्ये तो तेथील एका तरुणीच्या प्रेमात पडला. पण ते लग्नापर्यंत न पोहोचल्यामुळे त्याने फेसबुकवर खोटी प्रोफाइल बनवून महिलांना त्रास देणे सुरु केले.

X