Home | News | Fake instagram account of boni kapoor comment going viral about Arjun kapoor And malaika Arora relationship

मलाइका अरोरामुळे बोनी कपूरने अर्जुन कपूरला आपल्या संपत्तीतून केले बेदखल?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 12, 2019, 12:37 PM IST

मुलगा अर्जुन कपूर आणि मलाइकाच्या नात्याबाबतच्या बातम्यांना वडिलांनी सांगितल्या अफवा

  • Fake instagram account of boni kapoor comment going viral about Arjun kapoor And malaika Arora relationship


    मुंबई - अर्जुन कपूर आणि मलाइका अरोरा यांचे रिलेशनशिप अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अशातच त्यांच्या फोटोजमुळे सोशल मीडिया युझर्सनी त्यांना ट्रोल केले आहे. अशातच 'मी माझ्या संपत्तीतील एक रूपयाही अर्जुनला देणार नाही' अशी कमेंट व्हायरल होत आहे. ही कमेंट बोनी कपूर ऑफिशियल नावाने एका खोट्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अज्ञात व्यक्तीने केली आहे.

    सोशल मीडिया युझर्सनी केल्या कमेंट्स

    बोनी कपूरच्या या खोट्या अकाउंटच्या कमेंटवर एका युझरने उत्तर दिले की, 'काक तुम्ही एक रूपयाही नका देऊ त्या म्हातारीकडे बक्कळ पैसा आहे'. तर 'दादा-वहिणी झकास दिसत असल्याची' कमेंट दुसऱ्या एका युझरने केली आहे. पण बोनी कपूर यांच्याकडून दोघांच्या नात्याबाबत कोणीतीही सकारात्मक प्रतिक्रिया आली नाही. एका मुलाखतीदरम्यान जेव्हा त्यांना यांचे नाते आणि लग्नबद्दल विचारण्यात आले असता ही एक खोटी अफवा असल्याचे सांगत उत्तर देणे टाळले होते.

Trending