पंतप्रधान मोदींनी मुलीकडून / पंतप्रधान मोदींनी मुलीकडून वदवले 'राहुल गांधी पप्पू है...'? जाणून घ्या या व्हिडीओ मागचे सत्य

दिव्य मराठी वेब टीम

Nov 07,2018 12:06:00 AM IST

नॅशनल डेस्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमादरम्यान मुलीकडून 'राहुल गांधी पप्पू है...'? म्हणवून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुलीला म्हणत आहेत, ‘बोलो बेटा…’त्यानंतर ही मुलगी म्हणते ‘राहुल..राहुल गांधी पप्पू है।' मग पंतप्रधान मोदी मुलीच्या डोक्यावर हात ठेवून ‘वाह बेटा वाह’ म्हणत तिला शाबासकी देतात.

जाणून घ्या काय आहे या व्हिडिओचे सत्य

प्रत्यक्षात या व्हिडिओच्या ऑडिओशी छेडछाड करण्यात आली आहे. हा व्हिडिओ दोन वर्ष जुना आहे. सप्टेंबर 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी नवसारी येथे एक मेळावा आयोजित केला होता. त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दृष्टीहीन मुलीला रामायण ऐकवण्यासाठी सांगत आहेत.
त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पूर्णपणे फेक आहे.

X
COMMENT