Hollywood / फेक न्यूज : 'गेम ऑफ थ्रॉन्स' ची अभिनेत्री आर्या स्टार्क हिला म्हणाले गेले 'काश्मीरी गर्ल', इंडियन आर्मीविरुद्ध केले ट्वीट

ट्वीटने केला गेला द्वेष पसरवण्याचा प्रयत्न

​​​​​​​

दिव्य मराठी

Aug 07,2019 02:03:00 PM IST

हॉलिवूड डेस्क : सोशल मीडियावर 'गेम्स ऑफ थ्रॉन्स' ची अभिनेत्री आर्या स्टार्कचा एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टमध्ये आर्या काश्मीरची मुलगी असल्याचे सांगितले गेले आहे. पोस्टमध्ये लिहिले गेले आहे की, ही ती काश्मीरी मुलगी आहे, जिला इंडियन आर्मीने पॅलेट गनचा वापर करून आंधळे केले होते आणि आता ती रस्त्यांवर भीक मागते आहे.

हे आहे व्हायरल झालेले ट्वीट...
आर्याचा फोटो ट्वीट करणारे ट्विटर अकाउंट जैदू नावाचे आहे. ज्याने डिस्क्रिप्शनमध्ये स्वतःला जनरल कमर बाजवा याचा खाजगी सल्लागार असल्याचे सांगितले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले गेले आहे की, तो एक पाकिस्तानी आहे. जैदूने हेदेखील लिहिले आहे की, त्याचे सर्व ट्वीट्स मजेशीर 100% खोटे आणि काल्पनिक आहेत, ज्यांचा कोणत्याही मृत किंवा जीवित व्यक्तीसोबत समानता केवळ योगायोग आहे.

ट्वीटने द्वेष पसरवण्याचा प्रयत्न...
या ट्वीटमध्ये लिहिले गेले आहे की, 'काश्मीरी मुलगी जी पॅलेट गनच्या हल्ल्यामुळे आंधळी झाली होती. तिचे भाऊ पिता आणि आईची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तिच्या बहिणीवर भारतीय सेनेने रेप केला होता. जी आता श्रीनगरच्या रस्त्यावर भीक मागत आहे. माणुसकी कुठे आहे ?'

लोकांनी केले ट्रोल...
जैदूला या ट्वीटनंतर खूप ट्रोल केले जात आहे. एकाने लिहिले, 'तुम्ही लोक गाढवच राहाल.' एका यूजरने आर्या स्टार्क आणि 'गेम ऑफ थ्रॉन्स'ची माहिती दिली. काहींनी जैदूच्या ट्वीटवर रिप्लाय आणि कमेंट करणाऱ्यांचाही क्लास घेतला की, ते सत्य जाणून न घेता काहीही लिहीत आहेत. काहींनी लिहिले, 'आर्या स्टार्क काश्मीरला केव्हा आली.'

X