आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमीषा पटेलच्या कार अपघाताची खोटी बातमी व्हायरल, अभिनेत्रीने स्वतः फोटो शेअर करून लिहिले - 'मी सुरक्षित आहे' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सोशल मीडियावर बातम्या एवढ्या वेगाने व्हायरल होतात की, अनेकदा त्यामागचे सत्य समोर येतच नाही आणि बातमी अजून वेगाने पसरत जाते. अभिनेत्री अमीषा पटेलसोबतही असेच काहीतरी झाले. काही दिवसांपूर्वी तिच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली होती, पण ही बातमी पूर्णपणे खोटी निघाली. अमीषानुसार ज्या रस्त्यावर अपघात झाल्याचे सांगितले जात आहे, त्या रस्त्यावर ती मागील सहा महिन्यांपासून गेली नाही. 
 

 

अमीषा म्हणाली, मी पूर्णपणे ठीक आहे... 
अमीषाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आणि लिहिले, "मी हैरान आहे की, अशाप्रकारच्या बातम्या पसरवते कोण ? मीडिया कुठे जात आहे. मी पूर्णपणे ठीक आहे, तर मी जखमी झाले वगैरे असे काही नाही. मी पुन्हा हेच म्हणत आहे की, ही चुकीची बातमी आहे. जर असे काही असते तर मी तुमच्याशी बोलू शकले असते का ?"
 

फ्रॉड केसमध्ये फसले आहे अभिनेत्रीचे नाव... 
याचवर्षी जूनमध्ये अमीषावर चित्रपट 'देसी मॅजिक' साठी दिल्या गेलेल्या लोनबद्दल प्रो‌ड्यूसर अजय कुमार सिंहने 2.5 कोटी रुपयांच्या फ्रॉडचा आरोप केला होता. त्यानंतर रांची कोर्टात अमीषाविरुद्ध प्रकरण दाखल केले गेले. हे चेक बाउंसचे प्रकरण होते. अमीषाकडून याबाबतीत कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे अजयने कोर्टात केस फाइल केली होती.  

बातम्या आणखी आहेत...