आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक गाणं पोस्ट केले आणि उडाली रिटायरमेंटची अफवा तर भडकल्या ८९ वर्षांच्या लता मंगेशकर, म्हणाल्या हे कुण्या रिकामटेकडया मूर्खाचे काम आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आपल्या गायनाच्या कारकिर्दीत 25 हजार गाणे गायलेल्या लता मंगेशकरांच्या रिटायरमेंटची बातमी पसरली होती. ही बातमी खोटी आहे असे सांगत लता दीदी म्हणाल्या " हे कुण्यातरी रिकामे बसलेल्या मूर्खाचे काम आहे. मी रिटायरमेंट घेणार नाही आणि अखेरच्या श्वासापर्यंत गात राहीन." काही काळापूर्वी लता दीदींनी आपले एक मराठी गाणे सोशल मीडियावर पोस्ट केले होते त्या गाण्याला लोकांनी दीदींची रिटायरमेंट मानले. ते गाणं त्यांनी पाच वर्षांपूर्वी गायले होते. 

 

'आता विसाव्याचे क्षण' या गाण्याचा शब्दशः अर्थ घेऊन लोक्कांनी लता मंगेशकर रिटायरमेंट घेत आहेत अशी समजूत करून घेतली. लता दीदींना हे दोन दिवसांपूर्वी कळाले कारण घरी रिटायरमेंट्सही निगडित फोन कॉल आणि मॅसेजेस येऊ लागले. दुसरीकडे सत्य समजल्यामुळे त्यांचे चाहते मात्र खूप खुश आहेत. 

 

पाच वर्षांपूर्वी गायले होते हे मराठी गाणे.. 
एका मुलाखतीदरम्यान दीदींनी सांगितले की, 'हे गाणं मी पाच वर्षांपूर्वी गायले होते पण ते पोस्ट आता केले आहे. मला नव्हते माहित की लोक या गाण्याला माझ्या रिटायरमेंटशी जोडतील.' पुढे त्या म्हणाल्या, 'मला नाही माहित ही अफवा कशी पसरली. 2013 मध्ये संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी माझ्याकडे हे गाणं घेऊन आले होते. हे गाणं मी यासाठी गायले कारण ही कविता प्रसिद्ध कवी बाळकृष्ण भगवंत बोरकर यांची आहे आणि यापूर्वी मी त्यांची एकही कविता गायिली नव्हती.   

 

2015 मध्ये गेले होते फिल्मी गाणे.. 
13 व्या वर्षांपासून चित्रपटात गाणे गाणाऱ्या लता दीदींनी तीन वर्षांपूर्वी Dunno Y2... Life Is A Moment या चित्रपटासाठी एक गाणे गायले होते. 2017 मध्ये त्यांनी दोन भजन अल्बम रेकॉर्ड केले, 'राम रतन धन पायो' आणि 'राम श्याम गुणगान' ही ती दोन भजने. तब्बेतीच्या तक्रारींमुळे दीदी आता फिल्मी गाण्यांपासून दूर आहेत. पण सोशल मीडियावर त्या बऱ्याच ऍक्टिव्ह असतात. 

 

पहिले मजरुह सुलतानपुरी जेवण चाखायची आणि मग दीदींना दयायचे..  
1962 मध्ये लता दीदी 32 वर्षाच्या असताना त्यांना स्लो पॉइजन म्हणजे विष दिले गेले होते. लता दीदींच्या जवळच्या व्यक्ती पद्मा सचदेव यांनी त्यांचे पुस्तक 'ऐसा कहा से लाऊ ' मध्ये याचा उल्लेखही केला आहे. त्यानंतर कित्तेकदा रायटर मजरुह सुलतानपुरी त्यांच्या घरी जायचे.  ते आधी जेवण चाखायचे आणि मग लता दीदींना दयायचे. वास्तविक लता दीदींना मारण्याचा प्रयत्न कुणी केला हे आत्तापर्यंत कुणालाच कळाले नाही.  

 

बातम्या आणखी आहेत...