आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळेत गेलेल्या 3 युवकांनी मागितले रजिस्टर, शिक्षकाने विचारले - आधी तुमचा परिचय द्या; युवक म्हणाला - डीएम-एसपी देईल माझा परिचय, यानंतर जे झाले ते कधीच विसरू शकणार नाहीत हे 3 युवक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सिमरी बख्तियारपूर (पाटणा) :  येथील हुसैनचक विद्याल्यात शुक्रवारी शाळा तपासणीसाठी आलेल्या तीनपैकी दोन तोतया अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी चांगली चोप दिला. दोघांना मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच त्यांच्या कारला आग लावली. घटनेनंतर शाळा परिसरात काही तणाव पसरला होता. पोलिस घटनास्थळी दाखल होताच दोघांना ताब्यात घेतल्यानंतर शांतता पसरली. राघव आणि सुजीत कुमार असे अटक करण्यात आलेल्या तोतया अधिकाऱ्यांची नावे आहेत. तर दिलीप भागने हा तिसरा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. 


जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण 

गुरूवारी सकाळी 10 वाजता चकभारो गावातील रहिवासी राघव हा शाळेत दाखल झाला. तेथे आल्यानंतर त्यांने मुख्याध्यापक विद्यानंद पासवान यांच्याकडे रजिस्टरची मागणी केली. यावर मुख्याध्यापकांनी तुम्ही आधी तुमचा परिचय द्या असे विचारले असता, आम्ही पाटणा येथून आलो आहोत. जिल्ह्याचे डीएम आणि एसपी देखील माझी विचारपूस करत नाहीत. तर मग आमच्याबद्दल विचारणारे तुम्ही कोण अशा शब्दात प्रत्युत्तर दिले. दरम्यान गुरुवारी शाळेतील सर्व शिक्षकांनी त्यांची समजूत काढत त्यांनी परत पाठवले. दुसऱ्या दिवशी राघव आपल्या दोन साथीदारांसोबत पुन्हा शाळेत दाखल झाला. मुख्यध्यापक पासवान यांच्याकडे पुन्हा एकदा रजिस्टरची मागणी करत, तुम्हाल आता कोणीही वाचवू शकणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. 


ग्रामस्थांनी मारहाण करून केले जखमी
मुख्यध्यापकांच्या मते, ते पैशाची मागणी सुद्धा करत होते. इतक्यात इतर शिक्षकांनी त्यांची समजूत काढण्याच प्रयत्न केला. यावर राघव कुमार ठाकुर अद्दल घडविण्याची भाषा करू लागला. अखेर वाद विकोपाला गेल्यानंतर राघवला कार्यालयात बंद केले. तेवढ्यात ग्रामस्थ तेथे आले. त्यांना दोन लोकांनी पकडून मारहाण केली. दरम्यान तिसरा व्यक्ती फरार होण्यात यशस्वी झाला.

 

यामुळे सुरु झाला वाद

राघवने गुरूवारी शाळेत येऊन माझ्याकडे रजिस्टरची मागणी केली. त्यानंतर सर्व शिक्षकांनी त्याला समजावून परत पाठविले. दुसऱ्या दिवशी शाळेत गुंडगिरी करत यू आर सस्पेंडेड, ही खुर्ची तुझ्या बापाची आहे का? मला धमकी दिली. या गोष्टीवरून वादाला तोंड फुटले असल्याचे शाळेचे मुख्यध्यापक विद्यानंद पासवान यांनी सांगितले. 

 

 

पैसे वसूल करण्यासाठी गेले होते शाळेत

तिनही आरोपी तोतया अधिकरी बनून मुख्यध्यापकाकडून पैसे वसून करण्यासाठी गेले होते. फरार आरोपी दिलीप सिंहचा तपास सुरू असून तिघांविरूद्धा कारवाई होत असल्याचे डीएसपी मृदुला कुमारी यांनी सांगितले.