Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Fake photo of snake on Shivling was made by Sarpmitra

शिवलिंगावरील नागाचे छायाचित्र, सर्पमित्राने बनाव केल्याचे उघड

प्रतिनिधी | Update - Aug 29, 2018, 07:05 AM IST

शहरातील उत्तरेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगावर फणा काढून नाग बसल्याचे छायाचित्र सोमवारी सोशल मीडियात व्हायरल झाले. परंतु

  • Fake photo of snake on Shivling was made by Sarpmitra

    बार्शी- शहरातील उत्तरेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगावर फणा काढून नाग बसल्याचे छायाचित्र सोमवारी सोशल मीडियात व्हायरल झाले. परंतु हा सर्पमित्राचा प्रताप असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने मंिदरातील शिवलिंगावर नाग सोडून छायाचित्र काढल्याची माहिती समोर येत आहे.


    श्रावणी सोमवारनिमित्त सोमवारी पहाटेपासूनच मंदिरात अभिषेक व पूजेसाठी भाविकांची गर्दी होती. या वेळी एका सर्पमित्राने साेबत आणलेला नाग शिवलिंगावर ठेवून छायाचित्र काढले. सायंकाळी ते साेशल मीडियात व्हायरल झाले. याबाबत गुरव पुजारींना विचारले असता ते ितथे नसल्याचे त्यांनी सांगतिले. मात्र, अभिषेकावेळी एक सर्पमित्र पूजेसाठी आला होता, असे तेथील एका अन्य पुजाऱ्यांने सांगितले अन् हा बनाव उघड झाला.

Trending