आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट पोलिस.. हौस भागवण्यासाठी शिवला खाकी ड्रेस, 2 स्टारही लावले, एवढी मोठी चूक की राष्ट्रपतीच्या कार्यक्रमात केली ड्युटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगदलपूर - येथे पोलिसांमध्ये मिसळून वर्षभरापासून ड्युटी करणाऱ्या खोट्या पोलिसाला अटक करण्यात आली आहे. हा स्वतःला एसआयटीचा सदस्य असल्याचे सांगायचा आणि ड्रेसवर दोन स्टार लावायचा. त्याशिवाय तो वायरलेस घेऊन फिरायचा. एवढा हुशार होता की, पोलिसांबरोबरच राहायचा. एका सब इन्सपेक्टरबरोबर मैत्री करून त्याच्याबरोबरच राहू लागला होता. एवढेच नाही तर अनेक महत्त्वांच्या कार्यक्रमांना तो सुरक्षेच्या ड्युटीला उपस्थित होता. अगदी राष्ट्रपतींच्या दौऱ्यालाही तो अगदी स्टेजजवळ उभा होता. एवढी मोठी चूक उघड झाल्यानंतर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी धक्क्यात आहेत. 


हौसेसाठी शिवला होता ड्रेस 
शनिवारी रात्री पकडला गेलेला अमितेश झा (25) शहरातील हिकमीपारा येथील रहिवासी आहे. प्राथमिक चौकशीनुसार त्याने खाकी ड्रेसची हौस भागवण्यासाठी ड्रेस शिवलेला होता. आतापर्यंत जेवढ्या पोलिसांना तो भेटला त्यांना त्याने मूळ पोस्टींग कोंडागांव येथील असल्याचे सांगितले होते. स्पेशल इनव्हेस्टीगेशन टीम बताई थी। स्पेशल इंवेस्टिेगेशन (एसआयटी) मध्ये काम करत असल्याचे सांगत तो वेगवेगळ्या ठिकाणी जात होता. 


खाकी परिधान करून फिरायचा 
अमितेश काही वर्षांपूर्वीपर्यंत फोटोग्राफी करायचा. अचानक तो लोकांना सांगू लागला की, पोलिसांत त्यांची निवड झाली आहे. त्यानंतर तो चंदखुरी पोलिस ट्रेनिंग स्कूलमध्ये गेला आणि त्याठिकाणी काही फोटो काढले. त्यानंतर दोन गणवेश शिवले. एक खाकी गणवेश आणि एक डंगरी घणेश परिधान करून तो जगदलपूरमध्येच फिरायचा. अमितेश म्हणायचा की, त्याने 2011 बॅचमध्ये एसआईची परीक्षा पास केली आहे. लोकांना खरे वाटावे म्हणून त्याने एक ओळखपत्रही तयार केले होते. बस्तर जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक मोठ्या कार्यक्रमात तो सुरक्षेसाठी उपस्थित असायचा. अटकेनंतर त्याची चौकशी सुरू असून तो अधिकारी फार काही सांगत नाहीत. 


अधिकाऱ्यांनीच अनेकदा लावली ड्युटी 
शनिवारी रात्री दसऱ्याच्या ड्युटीदरम्यान काही डीआरजी जवानांना अमितेश यांच्या वागणुकीवर संशय आला. ते एका गाडीवाल्याला धमकावून वसुली करण्याच्या प्रयत्नात होते. त्यानंतरच तो बनावट पोलिस असल्याचे समोर आले. पोलिसही हे ऐकूण सुन्न झाले. पोलिस याबाबत काहीही सांगत नसून त्याला कोणाला भेटूही देत नाहीत. अनेकदा अधिकारी स्वतः त्याची ड्युटी लावायचे असे समोर आले आहे. 


पोलिसांशी मैत्री एवढी की, सब इन्सपेक्टरच्या घरी राहायचा 
वर्षभर पोलिसांच्या डोळ्यात धूकफेक करणाऱ्या अमितेशवर कोणालाही संशय आला नाही. तो नेहमी करपावंड येथील सब-इन्सपेक्टरबरोबर त्याच्या घरी राहायचा. त्याला पकडल्यानंतर गणवेश, आयकार्ड आणि एक वायरलेस अमितेशच्या घरातून जप्त करण्यात आला आहे. तो पोलिसांनी इश्यू केला होता की त्याने कुणाकडून घेतला याची चौकशी सुरू आहे. 


एसआयटीच्या अनेक लोकांबरोबर दिसायचा 
पोलिसांतील सुत्रांच्या मते, अमितेश झा पोलिसांच्या एसआयटीचा मेंबर असल्याचे सांगायचा. काही काळापूर्वी तो नक्षलींच्या शहरी नेटवर्कसाठी काम करणाऱ्या अभयला पोलिसांनी पकडले होते. त्याच्या तपासासाठी एसआयटी तयार करण्यात आली होती. त्यातील सदस्यांबरोबर अमितेश फिरायचा. त्यानंतर तो स्वतःला एसआयटीचा मेंबर असल्याचेही सांगायचा. विचारल्यानंतर तो अनेक जिल्ह्यांच्या विविध ठाण्यांमध्ये पोस्टींगची माहितीही द्यायचा. 

 

बातम्या आणखी आहेत...