आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Racket: बलात्काराचा आरोप लावण्याची धमकी देत 1 कोटींची मागणी; महिलेसह दोन जणांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फरीदाबाद - बलात्काराचे खोटे आरोप लावून पैसे उकळणाऱ्या रॅकेटचा हरियाणा पोलिसांना भांडाफोड केला आहे. या प्रकरणात एका महिलेसह तिच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. यातील महिलेने एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप लावण्याची धमकी देत 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. अटक करण्यात आलेली महिला पलवल येथील रहिवासी आहे. तर पुरुष आरोपीचे नाव नांगल जाट असे आहे. 


स्पेशल टीमची कारवाई...
16 ऑक्टोबर 2017 रोजी येथील आदर्श कॉलोनीत राहणाऱ्या रमेश कुमार जैन यांना अपहरण आणि बलात्काराचा खटला दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच तोंड बंद ठेवण्याच्या बदल्यात 1 कोटी रुपयांची खंडणी सुद्धा मागितली होती. रमेश जैन यांनी 6 नोव्हेंबर 2017 रोजी या प्रकरणात खटला दाखल केला होता. पीडितच्या मागणीवरून हे प्रकरण होडलवरून फरिदाबाद क्राइम ब्रांचला सुपूर्द करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिस निरीक्षक नवीन कुमार यांच्या नेतृत्वात स्पेशल टीम तयार करण्यात आली. त्यांनीच या रॅकेटचा भांडाफोड केला. 


अनेकांना केले शिकार...
अटक करण्यात आलेल्या महिलेने आपल्या सहकाऱ्यासोबत मिळून अनेकांना लुटल्याचेही समोर आले आहे. 20 नोव्हेंबर 2017 रोजी तिच्या सहकाऱ्याने एका व्यक्तीला अडकवून 12 लाखांची मागणी केली होती. परंतु, 3 लाख रुपये घेऊन त्याला सोडले. 10 नोव्हेंबर 2017 रोजी याच लोकांनी आणखी एकाला बलात्काराच्या खटल्यात अडकवून 20 लाख रुपयांची वसूली केली होती. त्यांच्याकडून 6 लाख 60 हजार रुपयांची वसूली केली होती. या प्रकरणात दोघांना अटक केली तरीही अशफाक, सलीम, दिनेश, रामबीर, गोपाल, रामधन आणि इतर दोन महिलांचा सुद्धा समावेश होता. त्या सर्वांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. रमेश जैन यांना त्यांनी 16 लाख रुपयांची खंडणी घेऊन सोडले होते. त्यांनी केलेल्या खटल्यानंतर या रॅकेटचा भांडाफोड झाला.

बातम्या आणखी आहेत...