Home | News | Falsafa movie will release in 14 September

रहस्यमय, थरार आणि नाते संबंधावर आधारित 'फलसफा' चित्रपट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 30, 2018, 01:24 PM IST

चित्रपट माध्यम हे समाजातील विविध गोष्टींवर नेहमीच प्रकाशझोत टाकून त्यांना रुपेरी पडद्यावर उतरवत असते.

  • Falsafa movie will release in 14 September

    एन्टटेन्मेंट डेस्क: चित्रपट माध्यम हे समाजातील विविध गोष्टींवर नेहमीच प्रकाशझोत टाकून त्यांना रुपेरी पडद्यावर उतरवत असते. असाच एक वेगळा प्रयत्न आगामी 'फलसफा' या चित्रपटातून करण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा एक तात्विक नाटक आहे जो बदल्याच्या परिस्थितीशी संबंधित आहे आणि एखाद्या व्यक्तीवर त्याचा कसा परिणाम होतो. या बद्दल चित्रपट भाष्य करतो.


    मनित जौरा, गीतांजली सिंग हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून चित्रपट दिग्दर्शक हिमांशु यादव असून चित्रपट निर्मिती वी के मोशन पिक्चर्सचा बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे. त्याचे निर्माता वी के यादव, कथा, पटकथा आणि निर्देशन हिमंशु यादव, कॅमेरा आणि संपादन नीतीश चंद्रा, गीत व संगीत सागर भाटिया, नृत्य अरविंद ठाकुर, अॅक्शन आर पी यादव, कला मनोज निशाद, पार्श्वसंगीत शांतता सुदमे, क्रिएटिव निर्माता नीतीश चंद्रा चित्रपटांचे वितरक आहेत पेन एन कैमरा इंटरनॅशनलच्या मेहमूद अली यांचे आहे.


    रहस्यमय, थरार आणि नाते संबंधावर आधारित असणारा फलसफा चित्रपट येत्या 14 सप्टेंबर पासून संपूर्ण भारतात प्रदर्शित होईल अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक हिमांशु यादव यांनी दिली आहे.

Trending