आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनचालकांना लुटणाऱ्या दोन तोतया पोलिसांना अटक; फलटण ग्रामीण पोलीसांची कारवाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - सीआयडीचे पोलीस कर्मचारी असल्याचे भासवून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना लुटल्याप्रकरणी दोन तोतया पोलिसांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली. सदरील घटना राजुरी (ता. फलटण जि. सातारा ) गावच्या हद्दीत घडली आहे.

दीपक बाबुराव पाटील (वय ३६) रा. धर्मपुरी ता. माळशिरस जि. सोलापूर हे दि. 30 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास फलटणहुन नातेपुतेकडे जात असताना राजुरी गावच्या हद्दीत त्यांच्या चारचाकी वाहनाला दोघांनी अडवून आम्ही सीआयडी पोलीस कर्मचारी आहोत. आमची नेमणूक फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात असून शिवीगाळ तसेच दमदाटी करून त्यांनी जबरदस्तीने पाटील यांच्याकडून 3200 रुपये काढून घेतले. ये-जा करणाऱ्या वाहनचालकांकडून ते पैसे घेत असल्याचे दिसून आल्यावर दीपक पाटील यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली. अखेर फलटण ग्रामीण पोलिसांनी किरण दिलीप नाळे (वय 24) आणि सूरज महादेव आडके (वय 23) (दोघे रा. धुळदेव ता. फलटण) या दोन तोतया सीआयडी पोलिसांना अटक करून त्यांच्याकडील पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच 11 सी एस 74 30 जप्त केली आहे. अधिक तपास संजय बोंबले करीत आहेत.