असेही प्रेम / सलमान खानला भेटण्यासाठी चाहत्याने सायकलवरून केला चक्का 600 किलोमीटरचा प्रवास

  • तिनसुकिया जिल्ह्यातील जगुन येथे राहणारे भूपेन लिक्सन यांनी 6 दिवसात 600 किमीचा प्रवास केला
  • गुवाहाटीत 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी फिल्मफेअर अवॉर्ड्सचे आयोजन, येथे भूपेन सलमान खानला भेटू शकतात

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 02:05:00 PM IST

गुवाहाटी - यावर्षीचा फिल्मफेअर मुंबईत नाही तर आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये सुरु होत आहे. 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमातील विजेत्यांच्या नावाची घोषणा याआधीच झाली आहे. येथे बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसोबत सलमान देखील येथे दाखल होईल या आशेने 52 वर्षीय एक चाहता 600 किलोमीटर सायकल चालवत त्याला भेटण्यासाठी गुवाहाटीत आला आहे.


तिनसुकिया जिल्ह्यातील जगुन येथील रहिवासी भूपेन लिक्सन यांनी 8 फेब्रुवारी रोजी आपली सायकल यात्रा सुरू केली होती. 6 दिवसांचा प्रवास करून ते 13 फेब्रुवारी रोजी गुवाहाटीत पोहोचले. त्यांनी आपल्यासोबत सलमान खानचा एक फोटो सुद्धा सोबत आणला आहे.


इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये भूपेनच्या नावे विक्रम

2013 मध्ये भूपेन यांनी हँडल न पकडता एका तासास 48 किलोमीटर सायकल चालवली होती. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांच्या या कामगिरीची नोंद आहे. सलमान खानला सुद्धा सायकल चालवायची आवड आहे आणि मुंबईत अनेकदा चालवताना पाहिले गेले आहे.

X