आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या आयआयटी कॅम्पसमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळले, पोलिसांना आत्महत्येचा संशय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी(आयआयटी)एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांना संशय आहे की, शुक्रवारी रात्री त्यांनी आत्महत्या केली असावी. पण घटनास्थळावर सुसाइड नोट मिळाली नाहीये.


मृतांमध्ये आयआयटीमधील लॅब टेक्निशीअन गुलशन दास, पत्नी सुनीता आणि आई कामता हे आहेत. हे कुटुंब कॅम्समध्येच राहत होते. ते मुळे हरियाणाचे रहिवासी होते. गुलशन आणि सुनीताचे लग्न याचवर्षी फेब्रुवारीत झाले होते.


फ्लॅटमधून मारहाणीची तक्रार मिळाली होती
पोलिसांनी सांगितल्यानुसार, शुक्रवारी रात्री फ्लॅटमधून मारहाणीची तक्रार आली होती. फ्लॅठवर गेल्यानंतर पोलिसांना फ्लॅटचे दार आतून बंद आढळले. त्यानंतर पोलिसांनी दार तोडून आत गेल्यावर त्यांना त्या तिघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले.