आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे । मावळ लाेकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ अजित पवार यांना पहिलेच तीन मिनिटांचे लिखित भाषणही नीट वाचता न आल्याने साेशल मीडियात ते माेठ्या प्रमाणात ट्राेल झाले. त्यामुळे यापुढील सभेत पार्थ नेमके काय बाेलतात अशी उत्सुकता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाेबतच नागरिकांना हाेती. बुधवारी मावळ तालुका प्रचार कार्यक्रमाचा शुभारंभ वडगाव मावळ येथे अायाेजित करण्यात अाला. यात गावपातळीपासून माजी मंत्र्यापर्यंत अनेकांनी भाषणे केली. मात्र, उमेदवार पार्थ पवार यांनी जाहीर सभेत बाेलणे टाळले.
पहिल्याच भाषणाची खिल्ली उडवली गेल्याने प्रसार माध्यमांपासून तूर्त तरी दूर राहा, भाषण आणि प्रतिक्रिया देण्याच्या फंदात न पडता फक्त गाठीभेटीवर भर दे, असा तंबीवजा सल्ला पवार कुटुंबीयांतून पार्थ यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मी ‘पार्थ’चा कृष्ण : उमेश
पार्थ पवार यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस उमेश पाटील म्हणाले, अजितदादा पवार हेसुद्धा राजकारणात प्रथम अाले त्या वेळी पहिल्या भाषणात भाषण न करताच खुर्चीत जाऊन बसले. मात्र, त्यानंतर उत्तम वक्ते अाणि काम करणारे नेते म्हणून नावारूपास अाले. पार्थ म्हणजे अर्जुन असून त्यांच्या रथाचे सारथ्य करणारा मी कृष्ण अाहे. त्यांना सर्वात जास्त मताधिक्क्याने निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर पवार कुटुंबीयांनी साेपवली अाहे. पवार कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीत उभी असल्याने त्यास मतदान करण्याचा आनंद, साैभाग्य मावळवासीयांना आहे. विकास अमुकतमुक करा, असे पवारांना सांगण्याची गरज नसून विकासाच्या ‘बारामती माॅडेल’चे काैतुक पंतप्रधानांनीही केलेले आहे. पार्थ यांनी बारामतीसारखा मावळचा विकास करू, असे सांगितले असून लाेकांना आणखी काय अपेक्षित आहे? गल्लीतील राजकारणासाठी आपणास खासदार नकाे तर संसदेत जाऊन इंग्रजी, हिंदीत प्रश्न मांडणारा खासदार हवा.’
भाषण काैशल्याचे मिळणार धडे
महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे वक्तृत्वावर प्रभुत्व आहे. विराेधकांवर टीका करताना ते सभा जिंकतात. नुकतेच राजकारणात दाखल झालेले पवार कुटुंबातील चाैथ्य सदस्य राेहित राजेंद्र पवारही बाेलताना कचरत नाहीत. पार्थ यांची मात्र अजून तशी पुरेशी तयारी झालेली नसल्याचे लक्षात आल्यामुळे आता त्यांना पक्षातून व पवार कुटुंबातून भाषणकाैशल्याचे धडेही दिले जाणार असल्याचे समजते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.