आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या जन्मानंतर नवस फेडायला गेले होते कुटुंबीय, भीषण अपघतात त्याचाच मृत्यू; जखमींना बाहेर काढण्यासाठी फोडाव्या लागल्या काचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यमुनानगर - शाकुंभरी देवीच्या दर्शनाला जाऊन माथा टेकत परतणाऱ्या एका कुटुंबियांच्या वाहनाला भीषण अपघात घडला. पांवटा साहिब हायवेवर त्यांचे वाहन ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकले. या अपघातात दीड महिन्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला असून इतर 6 जण जखमी आहेत. यापैकी एका मुलीसह पीडित मुलाच्या आजोबांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मूळचे यमुनानगर येथील एका गावातले असलेले हे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून रामगडमध्ये राहत होते. 


ज्या मुलाचा नवस फेडण्यासाठी गेले होते वाटेत त्याचाच मृत्यू
या भीषण अपघातात जखमी झालेल्या अमितने सांगितल्याप्रमाणे, दोन वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. मुलगा झाल्यास शाकुंभरी देवीच्या मंदिरात माथा टेकून नवस फेडणार असे मानले होते. पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा झाला. दीड महिन्यांच्या त्याच मुलाला घेऊन नवस फेडण्यासाठी कुटुंब गेले होते. ज्याच्या जन्मानंतर नवस फेडण्यासाठी गेलो होतो, त्याचासोबतच असे घडेल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. 


असा घडला अपघात, काचा फोडून जखमींना काढले...
कुटुंबियांनी नवस पूर्ण केला आणि गावी परतण्यासाठी निघाले होते. याच दरम्यान वाटेत त्यांच्या कार समोर एक भरधाव ट्रॅक्टर ट्रॉली जात होती. यांनीही स्पीड वाढवली. तेवढ्यात अचानक ट्रॅक्टर ड्रायव्हरने ब्रेक लावला आणि त्यांची कार ट्रॅक्टरमध्ये घुसली. अपघातानंतर ड्रायव्हर घटनास्थळावरून पसार झाला. हा अपघात इतका भीषण होता की दीड महिन्याच्या त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तसेच कारमध्ये असलेले सगळेच जखमी झाले. कारमध्ये जखमी इतके वाइट अडकले होते की त्यांना काचा फोडून बाहेर काढावे लागले.

बातम्या आणखी आहेत...