आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटूंबात सर्वांनी एकमेकांची काळजी घेतली तर प्रेम वाढते...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


प्राचीन काळातील एका कथेनुसार, एका गावात दोन भाऊ राहत होते. थोरल्या भावाचे लग्न झाले होते आणि त्याला एक मुलगा होता. लहान भाऊ अजून अविवाहीत होता. दोघेही भाऊ मिळून आपली शेती करत असे. पिक आता काढणीला आले होते म्हणून दोघा भावांनी पिक काढणीला सुरूवात केली. काम करता करता रात्र झाली. दोघांचा एक एक ढिग जमा झाला होता. काढलेले पिक रात्री घरी घेऊन जाणे शक्य नव्हते म्हणून दोघानी विचार केला की, आज रात्री पिक शेतावर ठेवून राखण करण्यासाठी थांबूया. सकाळी मजूर आणून पिक घरी घेऊन जाऊ. 


रात्री दोघांनाही खूप भुक लागली होती. त्यावर दोघांनीही विचार करून एक-एक जण घरी जाऊन जेवण करून परत यायचे असे ठरवले. आधी मोठा भाऊ जेवण करण्यासाठी गेला. शेतावर लहान भाऊ होता. थोड्या वेळाने त्याच्या मनात विचार आला की, मोठ्या भावाला पत्नी आणि मुलगा आहे, मी तर एकटाच आहे माझ्यापेक्षा धान्याची जास्त गरज भावाला आहे. असा विचार करून त्याने थोडे धान्य भावाच्या ढिगात टाकले. 


काही वेळाने त्याचा मोठा भाऊ आल्यावर त्याने छोट्या भावाला जेवायला घरी पाठवले आणि तो ढिगाऱ्याजवळ बसला. तेवढ्यात त्याची नजर लहान भावाच्या ढिगावर पडली. त्याला वाटले आपली काळजी घेण्यासाठी पत्नी आणि, मुलगा आहे, छोटा तर एकटाच आहे. त्याची काळजी घेण्यासाठी कोणीच नाही, त्याला आपल्यापेक्षा जास्त धान्याची गरज आहे. म्हणून त्याने आपल्या ढिगाऱ्यातील थोडे धान्य भावाच्या ढिगात टाकले. आता दोन्ही ढिगाऱ्यामध्ये धान्य समान झाले होते पण दोघां भावामध्ये प्रेम वाढले.  


कथेची शिकवण
जेव्हा कुटूंबातील सर्व सदस्य एकमेकांची काळजी करतात, दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतात तेव्हा त्यांच्यातील प्रेम नेहमी वाढत जाते.

बातम्या आणखी आहेत...