आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रक्रियेला बोलावून कुटुंब नियोजन न करताच घरी पाठवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर  - बिनटाक्याद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी येथील दोडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेल्या महिला रुग्णांना उपाशी ठेवून शस्त्रक्रिया न करताच माघारी पाठवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. महिलादिनाच्या दिवशी जमिनीवर झोपावे लागलेल्या रुग्णांची हेळसांड तर झालीच शस्त्रक्रियेसाठी केलेल्या चाचण्याही वाया गेल्या. शनिवारी तर रुग्णालयात वारंवार गोंधळ उडाला. या गडबडीत मुख्य प्रवेशाद्वाराजवळ डोक्यावर पडून एक महिला जखमी झाल्याचा झाली.    


लॅपरोस्कोपीच्या सहाय्याने (दुर्बिणीद्वारे) कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया शिबिरासाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतून महिलांची नोंदणी करण्यात आली होती. रुग्णालयाची क्षमता नसतानाह जास्त प्रमाणात रुग्ण दाखल करून घेतल्याने त्यांना जमिनीवरच झोपण्याची वेळ आली. शस्त्रक्रिया करावयाची असल्याने शनिवारी जेवण न घेण्याबाबत सूचना केल्या. रक्त, लघवी चाचण्याही रुग्णांनी पूर्ण केल्या होत्या. सर्व प्रक्रिया केलेल्या १२६ महिला रुग्ण दाखल होत्या.  


३७ महिला परतल्या
डॉ. जमदाडे श्रीरामपूरहून येणार होते. सकाळी ९ वाजता येणे अपेक्षित असताना पहाटे ५ ला त्यांना घेण्यासाठी गेलेले वाहन दुपारी १ वाजता आले. सीझर रुग्णांची शस्त्रक्रिया होणार नसल्याचे  दुपारी ४ वाजता सांगण्यात आले. त्यामुळे ३७ महिला रुग्णांना घरी पाठवण्याचा निर्णय जाहीर केला. शस्त्रक्रिया होणार नव्हत्या तर उपाशी का ठेवले, असा सवाल करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...