आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना 'नियोजन' ना नियंत्रण भाग २ : ५ वर्षांत ४८ शस्त्रक्रिया फेल, ३ वर्षांत ४ महिलांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य विभागामार्फत कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवला जातो. त्यामध्ये शस्त्रक्रियांचाही समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत ६३ हजार ४८२ शस्त्रक्रिया झाल्या. यामध्ये पुरुष शस्त्रक्रियांचाही समावेश आहे. मात्र, एकूण ४८ शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे गेल्या तीन वर्षांत चार महिलांचा मृत्यू झाल्याचेही डीबी स्टारच्या तपासात समोर आले आहे. 


लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी कुटुंब नियोजन हे प्रभावी माध्यम आहे. मात्र, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना मृत्यू होत असेल किंवा शस्त्रक्रिया अयशस्वी होण्याचे प्रमाण वाढत असेल तर हा काळजीचा विषय आहे. याचे ठोस कारण विभागाला देता आले नाही. 

 

देशाची लोकसंख्या वाढायला लागल्यानंतर १९५२ पासून कुटुंब नियोजनाची संकल्पना राबवण्यात आली. त्यानंतर सरकारी पातळीवर लोकांमध्ये प्रसार करण्यासाठी विविध योजना राबवल्या. 'हम दो हमारे दो' ही घोषणा लोकप्रिय ठरली. त्यानंतर 'छोटे कुटुंब सुखी कुटुंब' ही घोषणाही त्यात भर टाकणारी ठरली. देशभर कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबवताना काही महिलांचा कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करताना मृत्यू झाला. शस्त्रक्रिया अयशस्वी होण्याचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे २००५ मध्ये दाखल केलेल्या एका याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसारच देशात सर्व ठिकाणी कुटुंब नियोजन विमा योजना लागू करण्यात आली. केंद्र सरकारने २०१३ मध्ये कुटुंब नियोजन नुकसान भरपाई योजना सुरू केली. 

 

अशी आहे कुटुुंब नियोजन विमा योजना : केंद्र सरकारने २०१३ मध्ये कुटुंब नियोजन नुकसान भरपाई योजना सुरू केली. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना मृत्यू झाल्यास किंवा रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर सात दिवसांच्या आत मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. त्याचप्रमाणे डिस्चार्ज दिल्याच्या तारखेपासून ८ ते ३० दिवसांच्या दरम्यान मृत्यू झाल्यास ५० हजार रुपये, शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यास ३० हजार, शस्त्रक्रिया करतेवेळी वा ६० दिवसांत गुंतागुंत झाल्यास २५ हजार अशी भरपाई देण्याची योजना आहे. पण या भरपाईपेक्षाही महिलांचा मृत्यू होणे ही बाब धक्कादायक आहे. ती होऊ नये याचीच काळजी डॉक्टरांनी घेतली पाहिजे. ही योजना राबवण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर समिती स्थापन केली आहे. त्याचप्रमाणे या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर व तज्ज्ञाची पात्रता काय असावी याबाबत निर्देश दिले आहेत. 

 

कुठे करावी नोंद : शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू, गुंतागुत झाल्यास अर्जदाराने ज्या केंद्रात शस्त्रक्रिया केली, तेथे पूर्ण कागदपत्रांसह अर्ज सादर करावा किंवा जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्याकडे सादर करावा. 

 

प्रकरण प्रलंबित नाही 
कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया अयशस्वी होण्याची जी प्रकरणे येतात ती त्याच वर्षातली नसतात. फार आधी केलेली प्रकरणेही येतात. गेल्या वर्षीचे प्रकरणांचे वाटप झाले आहे. २०१८ मध्ये सर्व प्रकरणेदेखील मार्गी लागली आहेत. सध्या एकही प्रकरण प्रलंबित नाही. डॉ. सुनंदा पाटील, वै. अधिकारी, आरोग्य विभाग 

 

काय म्हणतात अधिकारी 
आरोग्य विभागाकडून डीबी स्टारने मिळवलेल्या माहितीनुसार खालीलप्रमाणे शस्त्रक्रिया झाल्या 

 

 

वर्ष अयशस्वी शस्त्रक्रिया  मृत्यू
२०१४-१५ ०३ ०१ 
२०१५-१६ १३ -- 
२०१६-१७ १० ०१ 
२०१७-२०१८ १९ ०२ 
२०१८ डिसेंबरपर्यंत ०३ -- ०.३ टक्के फेल्युअर रेट 
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अयशस्वी होण्याचे काही ठोस कारण देता येत नाही. तज्ज्ञ डाॅक्टर शस्त्रक्रिया करतात. प्रत्येक कुटंुुब कल्याण पद्धतीत तिचा स्वत:चा फेल्युअर रेट असतो.या प्रकारच्या शस्त्रक्रियेत ०.३ इतका फेल्युअर रेट असतो. डॉ. अमोल गिते, जिल्हा वैद्यकीय अधिकारी 

 

ना 'नियोजन' ना नियंत्रण भाग 1 : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांत 33% घट; पुरुषांचे प्रमाण फक्त 1 टक्का 

 

बातम्या आणखी आहेत...