हेल्प / 40 फूट खोल दरीत अडकले कुटुंब, बाटलीवर ‘हेल्प’ लिहून धबधब्यात सोडली, हायकर्सनी वाचवले

40 फूट खोल दरीत एका कुटुंुबाचा जीव एका बाटलीमुळे वाचला

Sep 15,2019 02:16:00 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेतील कॅलिफोर्नियात ४० फूट खोल दरीत अडकून पडलेल्या एका कुटुंुबाचा जीव एका बाटलीमुळे वाचला. यासंदर्भात माहिती अशी की, कर्टिस विटसन, त्यांची पत्नी व १३ वर्षाचा मुलगा कॅलिफोर्नियात फिरण्यासाठी आले होते. दरम्यान ते खोऱ्यातून जात अरोयो सेको नदी व नंतर एका धबधब्याकडे जाणार होते. परंतु तिसऱ्या दिवशी ते खोऱ्यातील एका अरुंद भागात अडकले. त्याच्या दोन्ही बाजूने उंच भिंती होत्या. तेथून बाहेर येण्यासाठी त्यांच्याकडे दोरही नव्हता. दरम्यान, कर्टिस यांनी एका बाटलीवर ‘हेल्प’ असा शब्द लिहून एका स्लिपवर संदेश दिला की, आम्ही धबधब्याजवळ फसलो आहोत आमची मदत करा.


त्या बाटलीत संदेशाची चिठ्ठी टाकली व बाटली पाण्यात फेकली. बाटली चारशे मीटर अंतरावर गेली होती. तेथे हायकर्सचा ग्रुप होता. त्यांनी तेथे जाऊन या कुटुंबाची सुटका केली. आम्ही चार तास दरीत अडकलो होतो. आमचे नशीब बलवत्तर म्हणून बाटली पाण्यातून वाहात या लोकांपर्यंत पोहचली, असे कर्टिस यांनी सांगितले.

X