आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Family Suicide: Tea Company Manager, Commits Suicide By Jumping In Front Of Train In Noida, After Wife Hanged With Child

आधी पतीने धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, मग पत्नीने मुलीचा खून करून केली आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा - राजधानीला लागून असलेल्या नोएडामध्ये सामूहिक आत्महत्येचे धक्कादायक प्रकरण शनिवारी समोर आले आहे. यात पतीने आत्महत्या केली. तर पत्नीने आपल्या अवघ्या 5 वर्षांच्या मुलीचा खून केला. यानंतर तिने देखील स्वतःचे आयुष्य संपवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी अवघ्या 8 तासांमध्ये हा संपूर्ण घटनाक्रम घडला. यातील पती एका चहा कंपनीमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत होता. प्राथमिक तपासात आर्थिक अडचणींमुळे दांपत्याने टोकाचे पाउल उचलले असे सांगितले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मूळचा चेन्नईचा असलेल्या भरत जे. सुब्रह्मण्यन (33) गेल्या काही वर्षांपासून नेपाळमध्ये कार्यरत होता. काही महिन्यांपूर्वी तो आपल्या पत्नी आणि मुलीसह नोएडात राहण्यासाठी आला होता. हे लोक सेक्टर-128 मध्ये जेपी पवेलियन कोर्टात राहत होते. भरतची पत्नी शिवरंजनी (31) एक गृहिणी होती. त्यांच्या 5 वर्षांच्या मुलीचे नाव जयश्रीता असे होते. भरतचा भाऊ कार्तिक सुद्धा याच ठिकाणी राहत होता. तो येथे कोचिंग घेत होता. तर भरत एका चहा कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता.

भरतच्या आत्महत्येनंतर अशा अवस्थेत सापडले माय-लेकीचे मृतदेह

भरतने शुक्रवारी सकाळी 11:30 च्या सुमारास जवाहरलाल नेहरू मेट्रो स्टेशनवर धावत्या ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवली आणि त्यानंतर पत्नी शिवरंजनीला फोन करून यासंदर्भातील माहिती दिली. पत्नी आपला दीर कार्तिकसोबत राममनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. रुग्णालयातून ती घरी परतली आणि तिने आपल्या चिमुकल्या मुलीचा खून केला. यानंतर तिने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. मायलेकीचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडले.

पोलिस अधिकाऱ्यांच्या तपासात भरत आणि शिवरंजनी यांचा 10 वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता अशी माहिती समोर आली आहे. भरत गोल्डन टिप्स या चहा कंपनीत महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. पोलिसांनी शेजाऱ्यांसह त्या कंपनीत सुद्धा चौकशी केली. यापूर्वी तो ज्या नेपाळच्या कंपनीत काम करत होता, त्या ठिकाणी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. आत्महत्या पैशांच्या अडचणींमुळे केली असावी असा केवळ अंदाज लावला जात आहे. आत्महत्येचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. यासंदर्भात सविस्तर तपास सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...