नाशिक - जिल्ह्यातील गोविंदनगर परिसरात एका धावत्या कारने पेट घेतला. या कारमध्ये पती-पत्नी आपल्या एका चिमुकलीसह प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात ते थोडक्यात बचावले आहेत. ट्विटरसह व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमण दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कारमध्ये असलेल्या फायर एक्सटिंगिशरने आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये गॅस किट लावण्यात आली होती. त्यामुळेच ही आग लागली आहे.