आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती क्रिटिकल..अमिताभ यांनी केली चांगल्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : कॉमेडियन आणि अभिनेते असलेले कादर खान क्रिटिकल कंडीशनमध्ये दवाखान्यात आहेत. त्यांना BiPAP वेंटीलेटरवर ठेवले गेले आहे. कादर खान यांच्या तब्येतीबद्दल कळल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर त्यांच्यासाठी प्रार्थना म्हणून एक पोस्ट केली आहे. अमिताभ आणि कादर खान यांनी 'दो और दो पांच', 'मुकद्दर का सिकंदर', 'मिस्टर नटवरलाल', 'सुहाग', 'कुली', 'शहंशाह' अशा चित्रपटात एकत्र काम केले आहे. यापूर्वी कादर खान यांना 2015 मध्ये आलेला चित्रपट 'लो हो गया दिमाग का दही' मध्ये पहिले गेले होते. 

 

अमिताभ यांनी लिहिले : "कादर खान... प्रचंड प्रतिभा असलेले अभिनेते आणि लेखक. बीमार आहेत आणि हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांच्या सुखरूपतेसाठी आणि त्यांच्या तब्येतीत लवकर  व्हाव्या म्हणून प्रार्थना करतो आहे. त्यांना मंचावर परफॉर्म करताना पहिले आहे, माझ्या चित्रपटांसाठी त्यांनी जबरदस्त  रायटिंग केले आहे, माझे चांगले मित्र आहेत आणि कित्तेक जणांना माहित नाही,मला गणितही शिकवले आहे.  

T 3041 - KADER KHAN .. actor writer of immense talent .. lies ill in Hospital .. PRAYERS and DUAS for his well being and recovery .. saw him perform on stage, welcomed him and his prolific writing for my films .. great company, a Libran .. and many not know , taught Mathematics ! pic.twitter.com/yE9SSkcPUF

— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 28, 2018

 

कादर खान यांचे हेल्थ अपडेट..

कादर खान यांना प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी डिसऑर्डर झाला आहे. ज्यामुळे मेंदूद्वारे कंट्रोल होणाऱ्या सर्व हालचालींवर  परिणाम झाला आहे. एंटरटेन्मेंट वेबसाइट स्पॉटबॉयच्या माहितीनुसार ही माहिती कादर खान यांचा मुलगा सरफराज खानने दिली आहे.  

 

खूप दिवसांपासून कॅनडात आहेत कादर खान..  

कादर खान मागील अनेक वर्षांपासून कॅनडामध्ये आपला मुलगा आणि सून, सरफराज आणि शाइस्ता यांच्यासोबत राहत आहेत. सरफराजच्या सांगण्यानुसार डॉक्टरांच्या टीमचे त्यांच्यावर सतत लक्ष होते. पण श्वसनाला होणाऱ्या त्रासामुळे त्यांना बाइपेप वेंटीलेटरवर ठेवले गेले आहे.  

 

काय आहे पीएसपी..  

प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी (पीएसपी) एक असामान्य मेंदूचा आजार आहे जो शरीराची गती, चालतांना स्वतःचे संतुलन, बोलणे, गिळणे, बघणे, मनःस्थिती आणि व्यवहारासोबतच चिचार करण्यावरही परिणाम करतो. हे डिसऑर्डर मेंदूमधील नर्व सेल्स नष्ट झाल्यामुळे होतो. 

 

अशी आहे कादर खान यांची हालत..  

मिळालेल्या माहितीनुसार कधी ते शुद्धीत असतात, पाहतात पण बऱ्याचदा नसतात. कादर खान यांनी बोलणे बंद केले आहे. त्यांच्यामध्ये निमोनियाचे लक्षणही दिसत आहेत. कादर खान यांचा मुलगा सरफराज आणि त्यांच्या सुनेने त्यांच्या उपचारात कसलीच कमी ठेवलेली नाही पण त्यांची तब्येत अजूनही नाजूकच आहे. 

 

मागच्यावर्षी झाली होती सर्जरी.. 

कादर खान यांच्या मुलाने 2017 मध्ये त्यांच्या गुडघ्याच्या सर्जरीविषयी सांगितले होते. ते जास्तवेळ चालायला घाबरत होते, त्यांना वाटायचे ते पडतील. त्यानंतर सतत त्यांची तब्येत खालावत गेली. 

 

बातम्या आणखी आहेत...