आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Famous Actor Kushal Punjabi Commits Suicide In His 37th Year, Worked With Salman In Film 'Salman e Ishq'

प्रसिद्ध अभिनेता कुशाल पंजाबीची वयाच्या 37 व्या वर्षी आत्महत्या, पत्नीमुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसलेला अभिनेता कुशाल पंजाबीचे निधन झाले आहे. कुशाल केवळ 37 वर्षांचा होता. त्याने आत्महत्या केली असल्याचे कळते आहे. त्याचा मृतदेह त्याच्या घरी लटकलेल्या अवस्थेत सापडला. वांद्रा पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, 'कुशालने त्याच्या राहत्या घरी फॅनला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याला भाभा रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला दाखलपूर्व मयत घोषित केले.' कुशालवर दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.


यावेळी पोलिसांना कुशलने लिहिली एक चिठ्ठीदेखील सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये त्याने लिहिले आहे की, 'माझ्या आत्महत्येस कोणासही जबाबदार धरू नये.'  परंतु याउलट त्याचा जवळचा मित्र आणि अभिनेता चेतन हंसराजने एक खळबळजनक खुलासा केला आहे. टाइम्‍स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, चेतन म्हणाला, 'हो, त्याने आत्‍महत्‍याच केली आहे. तो आपल्या पत्‍नीपासून वेगळे झाल्यापासून खूप दुखी होता. सोबतच तो बऱ्याच दिवसांपासून आजारीदेखील होता. मी काही दिवसांपूर्वीच त्याच्याशी बोललो होतो आणि त्याने मला सांगितले होते की, तो यामुळे खूप डिस्‍टर्ब आहे. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता की, या सगळ्या समस्यांमुळे एवढे दुखी व्हायचे नसते आणि यासर्वांतून पुढे गेले पाहिजे. मला कधीच वाटले नाही तो असे काही पाऊल उचलेल.'

कुशालच्या निधनाची वार्ता त्याचा जवळचा मित्र करनवीर बोहराने आपल्या सोशल मीडिया हँडलवर दिली.  

करणवीर बोहराने माहिती देताना आपला मित्र कुशालसाठी एक नोटदेखील लिहिली. करणनुसार, 'तुझ्या जाण्याच्या या बातमीने मी हैराण आहे, मी अजूनही ही गोष्ट स्वीकार करू शकत नाहीये, मला माहित आहे तू एका उत्तम जागी आहेस.' त्याने पुढे लिहिले, 'तू मला नेहमी आयुष्याप्रती प्रेरित केले आहे. मला नेहमी तू डान्सिंग डॅडीच्या रूपातच आठवशील.' कुशाल पंजाबी याला एक मुलगादेखील आहे. त्याचे नाव कियान असे आहे. कुशलचे त्याच्या मुलासोबतचे अनेक फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर पाहायला मिळतील.  

कुशालने इंडस्ट्रीमध्ये एक डान्सर आणि मॉडेल म्हणून आपले पाऊल टाकले होते. त्याने आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात 1995 मध्ये आलेल्या 'अ माउथ फुल ऑफ स्काय' ने केली होती. त्यानंतर तो 'लव्ह मॅरेज', 'कसम से', 'देखो मगर प्यार से', 'डॉन' यांसह अनेक सीरियल्समध्ये दिसला. कुशाल बॉलिवूडच्याही अनेक चित्रपटांचा भाग राहिला आहे. त्याने 'लक्ष्य', 'सलाम ए इश्क', 'हमको इश्क ने मारा' यांसह अनेक चित्रपटात काम केले आहे.