आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः बॉलिवूडमध्ये असे अनेक व्हिलन्स आहेत, जे त्यांच्या नावासोबतच त्यांनी वठवलेल्या भूमिकांसाठी ओळखले जातात. मग ते 'मिस्टर इंडिया' या चित्रपटात 'मोगॅम्बो'ची भूमिका साकारणारे अमरीश पुरी असो किंवा 'घातक'मध्ये 'कात्या' हे पात्र वठवणारे डॅनी. दोघांनीही आपल्या निगेटिव्ह पात्रांमुळे प्रचंड प्रसिद्ध झाले. बॉलिवूडच्या अनेक व्हिलन्सविषयी लोकांना बरंच काही ठाऊक आहे, पण त्यांच्या मुलींविषयी फारसे कुणाला ठाऊक नसावे. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या प्रसिद्ध व्हिलन्सच्या मुली कुठल्या क्षेत्रात नाव कमावत आहेत, त्याविषयी सांगत आहोत...
अमरीश पुरी
मुलगी : नम्रता पुरी
'मिस्टर इंडिया' या चित्रपटात मोगॅम्बोची भूमिका साकारणारे अभिनेते अमरिश पुरी यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. नम्रता पुरी हे त्यांच्या मुलीचे तर राजीव पुरी हे मुलाचे नाव आहे. नम्रता चित्रपटसृष्टीपासून दूर असून ग्रॅज्युएशननंतर तिने सॉफ्टवेयर इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली. सॉफ्टवेयर इंजिनिअरसोबतच ती एक कॉश्च्युम डिझायनर आहे. नम्रताचे लग्न शिरीष बागवेसोबत झाले असून तिला एक मुलगी आहे.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, बॉलिवूडच्या नावाजलेल्या खलनायकांच्या मुली कोणत्या क्षेत्रात आहेत कार्यरत...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.