आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Famous Buddhist Teacher Accused For Sexually Abusing Female Followers And Keeping A Harem

तिबेटी बौद्ध गुरू रिनपोचेंवर महिला शिष्यांच्या लैंगिक शोषणाचे आरोप, सुंदर तरुणींना 'हरम'मध्ये ठेवायचे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - दलाई लामा यांच्यानंतर सर्वात जास्त प्रसिद्ध असलेले तिबेटियन बौद्ध गुरूंवर महिला अनुयायांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली असून त्यांच्यावर महिला शिष्यांचा 'हरम' ठेवण्याचाही आरोप आहे.

 

दलाई लामांनंतर सर्वात जास्त पुजले जाणारे धर्मगुरू

71 वर्षीय बौद्ध गुरू सोग्याल रिनपोचे यांना अनेक वर्षांपासून अनुयायांकडून पूजले जाते. त्यांचे पुस्तक 'द तिबेटियन बुक ऑफ लिव्हिंग अँड डाइंग'च्या 30 लाखांपेक्षा जास्त प्रती विकलेल्या आहेत. त्यांना प्रत्येक जण श्रद्धेने पाहतो. परंतु प्रसिद्ध आणि प्रभावशाली सोग्याल यांचे एक दुसरा चेहराही या आरोपांमुळे समोर आला आहे.

 

लैंगिक शोषणाचे आरोप

कथितरीत्या सोग्याल हे सुंदर तरुणींचे एक हरम बाळगायचे आणि या तरुणींचे लैंगिक व मानसिक शोषण करायचे. रिपोर्ट्सनुसार, ते आपल्या महिला शिष्यांना आपली पाठ घासायला सांगायचे. सोबतच शिष्यांना ज्ञानमार्गाची प्राप्ती करण्याची लैंगिक संबंध ठेवण्यास सांगायचे.

 

महिला शिष्यांनी केली पोलखोल
या महिन्याच्या सुरुवातीलाच आलेल्या एका रिपोर्टमध्ये खुलासा झाला होता की, त्यांच्या अनेक महिला शिष्या शारीरिक, लैंगिक व मानसिक शोषणाच्या शिकार झाल्या आहेत.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की, सोग्याल यांच्या शिष्यांना कशापद्धतीने लैंगिक अत्याचार सहन करावे लागले होते. या बौद्ध गुरूंचे अनेक माजी शिष्यांनी त्यांच्या वर्तणुकीबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राकडे खुलासे केले आहेत.

एक शिष्या म्हणाली की, सोग्याल अत्याचारी आणि दुराचारी आहेत. त्यांना सेक्स, स्मोकिंग आणि मारहाण करण्याचे व्यसन आहे.

एका दुसऱ्या शिष्येने सांगितले, सोग्याल म्हणायचे की, त्यांच्या संपर्कात येणारी प्रत्येक गोष्ट पवित्र होते. यामुळे मुली त्यांच्या म्हणण्याला बळी पडायच्या.

 

एका शिष्येची धक्कादायक हकिगत...

रिनपोचे यांच्या एका माजी शिष्येने 2011 मध्ये कॅनाडियन टीव्हीवर याबाबत अनेक चकित करणारे खुलासे केले होते. त्यांनी दावा केला होता की, रिनपोचे यांनी त्यांचे लैंगिक शोषण केले.

मिमिी(बदललेले नाव ) म्हणाल्या होत्या की, मी एका दिवशी त्यांच्या रूममध्ये एकटीच होते. तेव्हा त्यांनी मला कपडे काढायला सांगितले. मला वाटले ही बहुधा समर्पणाची एखादी परीक्षा आहे. परंतु रिनपोचे यांनी माझ्यासोबत असुरक्षित लैंगिक संबंध बनवले. ते मला म्हणाले, 'माझ्या डोळ्यांत पाहा, हा तोच क्षण आहे जेव्हा तू तुझ्या गुरूशी कनेक्ट होऊ शकतेस.'

त्यांनी मला याबाबत कुणालाही काहीही सांगायला मनाई केली. ते म्हणाले, मी जर तसे केले नाही, तर संबंध कमजोर होतील.

रिनपोचे यांची रिग्पामध्ये आता कोणतीही भूमिका नाही. चॅरिटीने माजी आणि सध्याच्या चॅरिटी सदस्यांच्या छळावरून माफी मागितली आहे.

 

गुरूंनी मागितली माफी

दलाई लामांनीही या बौद्ध गुरूशी सर्व प्रकारचे संबंध तोडण्याची घोषणा केलेली आहे. सध्या रिनपोचे थायलंडमध्ये आहेत आणि त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

लॉ फर्म लेविस सिलकिनला लिहिलेल्या पत्रात हे बौद्ध गुरू म्हणाले, 'मी माझ्या शिष्यांसोबत संवाद करताना जे काही म्हणालो, जे काही केले, त्याचा उद्देश त्यांच्या आतील प्रकृतीला जागृत करणे होते.'

'तरीही, मला वाटते की, माझ्या हेतूंना आणि कार्याला चुकीच्या पद्धतीने जज करण्यात आले. काही जणांना या प्रकारच्या ट्रेनिंगचे अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत. याप्रकरणी मी माझी जबाबदारी स्वीकारतो आणि जर एखाद्याला तसे वाटत असेल, तर मी त्यांची माफीही मागतो.'

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी काही Photos..  

 

बातम्या आणखी आहेत...