आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई रिसेप्शनमध्ये कपिल ब्लॅक कोटमध्ये तर पत्नी दिसली ऑफशोल्डर गाऊनमध्ये.. फोटोग्राफर्सना बघून कपिल म्हणाला - माझ्या बायकोचे फोटो चांगले यायला हवेत...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माने सोमवारी रात्री मुंबईत लग्नाचे रिसेप्शन दिले होते.  यावेळी त्याची पत्नी गिन्नी चतरथ ग्रे कलरच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दिसली, तर कपिलने ब्लॅक कोट घातला होता. कपिल आणि गिन्नी स्टेजवर कधी एकमेकांशी गप्पा मारताना तर कधी फोटोग्राफर्सना पोज देताना दिसले.


कपिलने गमतीशीर अंदाजात दिली पोज...
- जेव्हा गिन्नी आणि कपिल स्टेजवर मीडियाला पोज देत होते, तेव्हा कपिलचा गमतीशीर अंदाज बघायला मिळाला. गिन्नी हसून मीडियाला पोज देत असताना कपिल तिच्यासमोर हात जोडून उभा होता. कपिलने विनोदी अंदाजात फोटोग्राफर्सना माझ्या बायकोचे फोटो चांगले यायला हवेत, असेही सांगितले. कपिल आणि गिन्नी 12 डिसेंबर रोजी विवाहबद्ध झाले. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी अमृतसर येथे त्यांचे पहिले रिसेप्शन पार पडले. तर 24 डिसेंबर रोजी बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी मुंबईतील जे. डब्ल्यू मॅरियट होटलमध्ये त्याने रिसेप्शन होस्ट केले होते.  

बातम्या आणखी आहेत...