आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिझायनरच्या आईवर झाले अंत्य संस्कार, अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता आणि सलमानच्या भाऊ-बहिणीव्यतिरीक्त नाही पोहोचला एकही मोठा स्टार : Photos

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडनीस यांच्या आईचे रविवारी निधन झाले. त्यांच्यावर संध्याकाळी मुंबई येथील स्मशानभूमिवर अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी विक्रम फडनीस यांच्या आईच्या अंत्य विधिसाठी बॉलिवूडमधील कोणताही मोठा स्टार दिसला नाही. मात्र अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता, साजिद खान, मनीष पॉल, अरबाज खान, अलविरा अग्निहोत्री आणि अब्बास मस्तान यांची उपस्थिती होती. 

 

जेव्हा स्टेजवरच रडू लागले होते विक्रम फडणीस... 
विक्रम फडनीस मागील 28 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. बॉलिवूडमध्ये 25 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने विक्रम यांनी 2016 मध्ये एक फॅशन शो ऑर्गनाइज केला होता. या शोमध्ये अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी सामील झाले होते आणि स्वतः अमिताभ बच्चन शोचे स्टॉपर बनले होते. रॅंम्पवॉकनंतर विक्रम आपल्या संपूर्ण टीमसोबत स्टेजवर आले होते आणि त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी ते इमोशनल झाले आणि स्टेजवरच रडू लागले. विक्रम फडनीस यांनी मराठी चित्रपट 'ह्रदयांतर' चे दिग्दर्शन केले होते. 

बातम्या आणखी आहेत...