आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपना चौधरीने धरला काँग्रेसचा हात; हरियाणवी डान्सरने ट्वीट करून केली अधिकृत घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रसिद्ध हरियाणवी डान्सर आणि सिंगर सपना चौधरीने सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. तिने काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. गेल्या काही दिवसांपासून ती राजकारणात येणार असल्याची चर्चा होती. त्याच वृत्तास सपना चौधरीने ट्वीट करून अधिकृत दुजोरा दिला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी तिने काँग्रेस प्रवेश केल्यानंतर तिला तिकीट देखील नक्कीच दिले जाणार असे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रदेश संघटक नरेंद्र राठी यांनी दिल्लीत सपनाला पक्षाचे सदस्यत्व दिले.

 

कांग्रेस पार्टी जॉइन करके मैं काफी खुश हूं।#SapnaChaudhary pic.twitter.com/z8ZcwBjo2m

— SapnaChoudhary (@SapnaChouhdhary) March 24, 2019


काँग्रेसमध्ये सामिल होऊ खुश -सपना
सपना चौधरीने काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर एक ट्वीट केले. त्यामध्ये आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करून खुश आहोत असे तिने लिहिले. यासोबतच, राज बब्बर यांनी सपना चौधरी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांचा एक फोटो ट्वीट केला. तसेच सपना चौधरीचे काँग्रेसमध्ये स्वागत असे लिहिले. सपना चौधरीला काँग्रेसतर्फे मथुरा येथून खासदारकीचे तिकीट मिळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, काँग्रेसने 8 उमेदवारांची यादी आधीच जारी केली असून मथुरा येथून महेश पाठक यांना तिकीट देण्यात आले आहे. तरीही ऐनवेळी बदल करून सपनाला मथुरेचे तिकीट दिले जाऊ शकते. याच मतदारसंघातून हेमा मालिनी भाजपच्या संभावित उमेदवार आहेत.

 

सपना चौधरी जी का कांग्रेस परिवार में स्वागत ! pic.twitter.com/I0yLHWTm0k

— Raj Babbar (@RajBabbarMP) March 23, 2019

 

 

बातम्या आणखी आहेत...