आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील एका भंगाराच्या दुकानात सापडले गीतकार साहिर लुधियानवी यांच्या हस्तलिखित नज्म आणि डायरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- "मैं पल दो पल का शायर हूं...", "कभी-कभी मेरे दिल में ख्याल आता है..." सारखे सदाबहार गीत लिहीणारे प्रसिद्ध शायर आणि गीतकार साहिर लुधियानवी यांच्या मौल्यवान हस्तलिखित पत्र, डायरी, नज्मं आणि ब्लॅक अँड व्हाइट फोटोज मुंबईच्या जुहूमध्ये एका भंगारच्या दुकानात आढळले.


मुंबईतील संघटना फिल्म हेरीटेज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवेंद्र सिंह डुंगरपुर यांनी सांगितले की, या डायरीमध्ये त्यांनी आपल्या दैनदिंन आयुष्यातील घडमोडी लिहील्या आहेत, जसे रोजचे कार्यक्रम, गाण्याच्या रेकार्डिंग किंवा कुठे जायचे आहे इत्यादी.

सुरक्षित ठेवणार
यात अनेक नज्मं आणि नोट आहेत. त्या काळातील संगीतकार रवी, तसेच त्यांचे मित्र हरबंस यांनी लिहीलेले पत्र आहेत. हे पत्र इंग्रजी आणि उर्दू मध्ये आहेत. त्यांनी 3 हजार रुपयात या सर्व गोष्टी भंगारवाल्याकडून विकत घेतल्या आणि आता त्या सुरक्षित ठिकाणी ठेवणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...