आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Famous TV Actor Arjun Bijlani Said 'There Should Be Counselings Centres And Helplines For The Depressed People'

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी म्हणाला - 'नैराश्यग्रस्त लोकांसाठी समुपदेशन केंद्र आणि हेल्पलाइन असाव्यात'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सोशल मीडिया नैराश्याचे एक मोठे आणि प्रमुख कारण असल्याचे अर्जुन बिजलानी म्हणतो. सध्या सोशल मीडियावर कोणाच्याही पोस्ट पाहून ते लोक खूपच खुश आहेत, असे वाटते. सोशल मीडियावरील अशा पोस्ट पाहून जे लोक उदास आणि नैराश्यात असतात, ते आणखी खचून जातात. त्यांना वाटते, आपल्या जीवनात सर्व काही चुकीचे होत आहे आणि इतरांच्या जीवनात सर्व काही सुरळीत सुरू आहे, असे त्यांना वाटत असते.

सोशल मीडिया लोकांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका साकारत आहे, असे मला वाटते. पण मी चुकीचा असू शकतो मात्र आज आपल्यालादेखील इतरांच्या बाबतीत सर्व काही माहित असते. आता सर्व काही सहज शक्य होते. आज कोणी काही विकत घेतले तर ते सोशल मीडियावर टाकले जाते, नवीन कपडे घातले, तर ते फोटो शेअर केले जातात. यातून प्रत्येकाला इतरांच्या बाबतीत कळते. एखाद्याची पोस्ट पाहून एखाद्याला वाटते की, त्याच्याकडे सर्व काही आहे, तो खूपच खुश आहे. मात्र खऱ्या आयुष्यात तो नैराश्यातदेखील असू शकतो, ते कळत नाही आणि ते कधी समोरही येत नाही.

आपल्यात काय कमतरता आहे आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागेल, याचे आकलन करायला हवे. आपल्या ध्येयप्राप्तीसाठी प्रचंड मेहनतीची तयारी करावी लागते.


सुरुवातीपासूनच स्वत: ला मजबूत ठेवायला हवे, कारण प्रत्येक क्षेत्रात अपयश येत असतेच. नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलेल्या प्रत्येकाची निवड होतेच असे नाही. पण प्रयत्न करत राहिले पाहिजे. आजूबाजूच्या लोकांमध्ये आनंदाचे वातावरण ठेवले पाहिजे.

नैराश्यात असल्यावर मनमोकळे बोला

अर्जुन म्हणाला, "लोक डिप्रेशनविषयी मनमोकळी चर्चा करत नाहीत. कारण त्यांना काम मिळणार नाही याची भीती असते. कुणावर विश्वास ठेवत नाहीत. खरं तर, ही वाईट गोष्ट आहे. नैराश्यात गेल्यावर जागरूकता करायला हवी किंवा त्यासाठी सेेंटर्स हवेत. एखादी हेल्पलाइनदेखील हवी. कुणी अडचणीत असल्यावर त्या हेल्पलाइनवर फोन केला तर मदत होऊ शकेल.
 

बातम्या आणखी आहेत...