आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Fan Asked Kajol Would She Marry Shahrukh If She Didn't Get Ajay? The Actress Gave A Tremendous Answer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजय भेटला नसता तर शाहरुखसोबत लग्न केले असते का? चाहत्याने विचारला प्रश्न, काजोलने दिले भन्नाट उत्तर 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री काजोलने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग सेशल होस्ट केले. एका चाहत्याने काजोलला जर तिच्या आयुष्यात अजय देवगण नसता तर तिने शाहरुख खानशी लग्न केले असते का? असा प्रश्न विचारला. त्यावर काजोलने दिलेले उत्तर वाचून तुम्हालाही हसू येईल. ‘पुरुषाने प्रपोज करायचं असतं ना’ असे उत्तर दिले आहे. त्यानंतर एका चाहत्याने शाहरुख आणि तू पुन्हा एकत्र कधी दिसणार असा प्रश्न देखील विचारला आहे. त्यावर काजोलने ‘शाहरुखलाच विचारा’ असे उत्तर दिले आहे.

Au revoir..... Paris!

A post shared by Kajol Devgan (@kajol) on

पहिल्या क्रशसोबत लग्न - काजोल

अजय आणि काजोल यांनी 24 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न केले होते. त्यांच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे म्हणजे जवळजवळ दहा वर्षांनी अजय आणि काजोल 'तान्हाजी' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहेत. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार असून तो तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. तर काजोल तान्हाजी यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केले आहे. यापूर्वी दोघे 2010 मध्ये आलेल्या 'टूनपुर का सुपरहीरो'मध्ये एकत्र झळकले होते.

बातम्या आणखी आहेत...