आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fan Asks Dharmendra If Hema Malini Has Ever Picked Up A Broom At Home, Dharmendra Gave Nice Answer

झाडू पकडण्यावरून सोशल मीडियावर ट्रोल झाली हेमा मालिनी, धर्मेंद्र म्हणाला - मला पण ती वेंधळी वाटत होती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - 83 वर्षीय धर्मेंद्र सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टीव्ह असतात. ते नेहमीच आपल्या आयुष्याशी निगडीत काही अपडेट्स चाहत्यांशी शेअर करतात आणि त्यांच्या प्रश्नांचे उत्तरे देखील देतात. धर्मेंद्र यांनी नुकताच ट्विटर एक व्हिडिओ शेअर केला, या व्हिडिओत ते म्हशीसोबत गमतीशीर गप्पा मारताना दिसत आहेत. या व्हिडिओवर काही युझर्सनी कमेंट करत असताना त्यांनी हेमा मालिनीबाबत एक प्रश्न विचारला. धर्मेंद्र यांनी त्या प्रश्नाचे गमतीशीर उत्तर देखील दिले. 

 

 

युझरने हेमा मालिनीबद्दल विचारला प्रश्न
हेमा मालिनी नुकतीच स्वच्छ भारत अभियानांतर्गत संसदेबाहेर झाडू मारताना दिसून आली होती. पण झाडू पकडण्याची पद्धतीने तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले. अशातच एका युझरने धर्मेंद्र यांना विचारले की, सर मॅडमने कधी आयुष्यात झाडू हातात घेतला आहे का? यावर धर्मेंद्रने उत्तर दिले - हो, पण चित्रपटांत. मला पण ती यावेळी वेंधळी वाटत होती. पण मी लहानपणी माझ्या आईला कामात मदत केली आहे. मी झाडू मारण्यात पारंगत होतो. मला स्वच्छता आवडते. 

 

धर्मेंद्रच्या प्रामाणिकपणाचे चाहत्याने केले कौतूक :

धर्मेंद्रने दिलेल्या या प्रामाणिक उत्तराचे चाहत्याने कौतूक केले. तो म्हणाला की, तुमच्या प्रामाणिक उत्तराने माझे मन जिंकले. मी तुमचा खूप सन्मान करतो. धर्मेंद्र आणि हेमा यांनी 1980 मध्ये लग्न केले होते. हेमा ही धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आहे.