आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरापासून चित्रपटांपासून दूर आहे SRK, चाहत्याने दिली धमकी - "चित्रपटाची घोषणा कर नाही तर मी आत्महत्या करेन"

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता शाहरुख खान गेल्या एका वर्षापासून कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. चित्रपटांच्या इतक्या लांब ब्रेकमुळे शाहरुखचे चाहते बैचेन झाले आहेत. ते आपल्या आवडत्या अभिनेत्याला लवकरात लवकर रुपेरी पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहेत. शाहरुखने या वर्षात बर्‍याच वेळा एखादा प्रोजेक्ट साइन करण्याचे संकेत दिले खरे पण  ते होऊ शकले नाही. अशा परिस्थितीत चाहत्यांनी ट्विटरवर हॅशटॅग व्हायरल केले आहे. #WeWantAnnouncementSRK हा हॅशटॅग वापरुन काही चाहते शाहरुखला चित्रपटात परतण्याचा सल्ला देत आहेत. तर कुणी त्याला चक्क धमकी देत आहे. 

एका चाहत्याने दिली आत्महत्येची धमकी: एका यूजरने तर ट्विटरच्या माध्यमातून शाहरुखला चक्क धमकीच दिली आहे. त्याने ट्विटरवर लिहिले की, "1 जानेवारीपर्यंत नवीन चित्रपटाची घोषणा न केल्यास मी आत्महत्या करेन, तर मी आत्महत्या करेन असे मी पुन्हा सांगतोय."

शाहरुखच्या आणखी एका चाहत्याने लिहिले, "खान सर, आता खूप झाले, आम्ही तुम्हाला 'झिरो' नंतर चित्रपटात पाहिले नाही, जेव्हा तुम्ही पडद्यावर नसता तेव्हा आम्हाला मजा येत नाही, आता तुम्ही आम्हाला यशराज फिल्म्सचा धूम किंवा अतली कुमारचा एखादा चित्रपट साइन करुन गुड न्यूज द्या. आपण फिल्म इंडस्ट्रीचा जीव आहात. #WeWantAnnouncementSRK

आणखी एका यूजरने लिहिले, "आम्हाला माहित आहे की 'झिरो' हा तुमच्यासाठी एक खास चित्रपट होता, परंतु तुम्ही स्वतःला अशी शिक्षा देणार का? सर हे बरोबर नाही. नवीन वर्षात एखादी मोठी घोषणा करा. ”ट्विटबरोबरच अनेक चाहत्यांनी ट्विटरवर मिम्सही शेअर केले.

'झिरो' नंतर शाहरुखचा कोणताही चित्रपट आला नाहीः शाहरुख खान 2018 मध्ये आनंद एल रायच्या 'झिरो' चित्रपटात दिसला. या चित्रपटाच्या अपयशामुळे शाहरुख खचला  होता आणि त्याने काही काळ ब्रेकवर जाण्याची घोषणा केली होती. त्यानंतर एक वर्ष उलटून गेले तरी शाहरुखने कोणताही चित्रपट साइन केलेला नाही.