Home | Party | fanney khan screening, boney kapoor, madhuri dixit came to atttend

Screening Pics: पत्नी ऐश्वर्याची फिल्म बघायला पोहोचला अभिषेक, अनिल कपूर यांनी आराध्यासोबत केले Shake Hand

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 04, 2018, 12:06 PM IST

अभिनेता अभिषेक बच्चनने गुरुवारी रात्री पत्नी ऐश्वर्या रायचा 'फन्ने खान' हा चित्रपट बघितला.

 • एंटरटेनमेंट डेस्कः अभिनेता अभिषेक बच्चनने गुरुवारी रात्री पत्नी ऐश्वर्या रायचा 'फन्ने खान' हा चित्रपट बघितला. गुरुवारी बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. हा चित्रपट बघण्यासाठी अभिषेक पत्नी ऐश्वर्या, मुलगी आराध्या आणि सासूबाई वृंदा रायसोबत पोहोचला होता. चौघांना बघून मीडियाच्या फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटोज क्लिक केले. कारच्या मागील सीटवर बसलेल्या ऐश्वर्या आणि आराध्या यांनी फोटोग्राफर्सना बघून हसून पोज दिली. तर अभिषेकने मात्र हात जोडून फोटोग्राफर्सना फोटोज क्लिक न करण्यास सांगितले.
  ऐश्वर्याचा चित्रपट बघितल्यानंतर अभिषेकने ट्वीट करुन चित्रपटाचे कौतुक केले. त्याने लिहिले की, हा चित्रपट एक चांगला संदेश देतो. त्याने संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आणि सोबतच ऐश्वर्या त्याची फेव्हरेट अभिनेत्री असल्याचेही सांगितले.

  अभिषेकचे ट्वीट, "Just saw #FanneyKhan. What a beautiful film. A great message and worthy film. Congratulations to the entire team. Leaves a huge emotional lump in your throat. @AnilKapoor, Rajkumar, Pihu, @divyadutta25 are all so, so good. And the Mrs. continues to be my favourite! Best wishes.'

  हे सेलेब्सही पोहोचले स्क्रिनिंगला...
  या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला बी टाऊनचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. शबाना आझमी, माधुरी दीक्षित, गुलशन ग्रोवर, बोनी कपूर, पत्रलेखा, मल्लिका शेरावत यांच्यासह अनेक सेलेब्स यावेळी दिसले. अनिल कपूर यावेळी चिमुकल्या आराध्याचे लाड करताना दिसले.

  फन्ने खान हा चित्रपट 3 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला असून या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर, राजकुमार राव आणि पीहू सैंड लीड रोलमध्ये आहेत. अतुल मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

  पुढील स्लाईड्सवर बघा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या बॉलिवूड सेलेब्सचे खास PHOTOS...

 • fanney khan screening, boney kapoor, madhuri dixit came to atttend

Trending