आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fan's Advice 'Anil Kapoor Should Be CM', Anil Answered, 'i Am Happy Being Actor'

अनिल कपुरला चाहत्याने दिला मुख्यमंत्री बनण्याचा सल्ला, अनिलने दिले 'हे' उत्तर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. यादरम्यान एका फॅनने सल्ला दिला की, जोपर्यंत कोणताही पर्याय निघत नाही तोपर्यंत अनिल कपूर यांना सीएम बनवले पाहिजे. फॅनला त्याच्या ट्वीटवर परफेक्ट रिप्लाय देत अनिल कपूर म्हणाले, मी अभिनेताच ठीक आहे.  

सर्वांना आवडली होती ती भूमिका... 
विजय गुप्ता नावाच्या ट्विटर हॅण्डलवरून हे ट्वीट केले गेले आहे, "महाराष्ट्रात जोपर्यंत कोणता मार्ग निघत नाही, तोपर्यंत अनिल कपूर यांनाच मुख्यमंत्री बनवून पाहुयात. पडद्यावर त्यांचा एका दिवसाचा कार्यकाळ सर्वांनी पहिला  आहे अजनी त्याचे कौतुकही केले आहे. देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे काय विचार करत आहेत ??"

18 वर्षांपूर्वी आला होता चित्रपट 'नायक'... 
अनिल कपूर यांचा चित्रपट 'नायक' 2001 मध्ये आला होता. ज्यामध्ये ते सीएमचे चॅलेंज एका दिवसाचे सीएम बनण्याचे एक्सेप्ट करतात. एका दिवसात जसे सरकार चालवले ते पाहून लोक त्यांना पॉलिटिक्स जॉइन करण्याचा आग्रह करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन एस शंकरने केले होते. हा चित्रपट 1999 मध्ये आलेला तमिळ-तेलगु चित्रपट 'मुधालवन' चा हिंदी रीमेक होता.