सात वर्षांत इतकी / सात वर्षांत इतकी बदलली सलमानची हिरोईन, ओळखणेही झाले कठिण; सोशल मीडियावर लोक म्हणाले, ही तर पाण्याची टाकी दिसतेय!

Oct 23,2018 10:46:00 AM IST

बॉलिवूड डेस्क - गेल्या 7 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर असलेली अभिनेत्री आयशा टाकिया रविवारी मुंबईतील एका सॅलूनजवळ स्पॉट झाली. यावेळी टिपलेले तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिचा लुक इतका बदलला की लोकांना तिला ओळखणे कठिण झाले आहे. आपल्या या लुक्समुळे लोक तिला ट्रोल करत आहेत. काहींनी विचारले, की तू सर्जरी का केलीस? तर काही लोकांनी तिच्यावर विचित्र कॉमेंचट केले आहेत. एकाने तर तिला पाण्याची टाकी असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने तिची तुलना किम कर्दाशियनसोबत केली.


यूजर्सकडून झाली ट्रोल
- सोशल मीडियावर तिच्या लुकची लोक थट्टा मस्करी उडवत आहेत. त्यापैकी एकाने विचारले, 'अरे ही कोण? तर दुसऱ्या एकाने म्हटले ही तर राखी सावंत आहे.' आणखी एकाने लिहिले, की ही तर हुबेहूब किम कर्दाशियन दिसतेय.'
- काहींनी तिची सर्जरी बिघडल्याचा दावा केला. काय होतीस आणि काय झालीस, हिला सर्जरीने दगा दिल्यासारखे वाटते. तर दुसऱ्याने लिहिले, हिला वेळीच बुर्खा घालावा लागेल. लोकांना हिची भीती वाटत असावी.

X