आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fans Gather At Midnight Outside Mannat For Srk Birthday, Shah Rukh Accepts Fans' Love

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्री 'मन्नत'बाहेर जमले फॅन्स,  शाहरुखने केला चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आज आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही त्याची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी हजारो चाहत्यांनी मध्यरात्री त्याच्या घरी ‘मन्नत’वर गर्दी केली होती. शाहरुखनेही गच्चीत येऊन आपल्या चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

दरवर्षी शाहरुखचे चाहते ठिकठिकाणहून एकत्र येऊन आपल्या लाडक्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. याही वर्षी चाहत्यांची मोठी गर्दी मन्नतबाहेर जमली होती. शाहरुख बाहेर येताच चाहत्यांनी 'हॅप्पी बर्थडे टू यू...' असं गात त्याला शुभेच्छा दिल्या.  चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याची झलक यावेळी त्यांच्या कॅमे-यात कैद केले. यावेळी शाहरुख ब्लू डेनिम आणि ब्लॅक स्वेटशर्टमध्ये दिसला. शाहरुखला फिल्म इंडस्ट्रीत 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. काही दिवसांपूर्वी शाहरुख 'झिरो' या चित्रपटात झळकला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता.  दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलींच्या आगामी 'सनकी' या चित्रपटात शाहरुख झळकणार आहे.