आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : यावर्षी रिलीज झालेला झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' चित्रपटाने चांगली कमाई केली होती. तो या वर्षी कमाईच्या बाबतीत चौथ्या नंबरवर होता. आता रणवीर सिंह आणि आलिया भट यांना घेऊन या चित्रपटाच्या सिक्वेलवर चर्चा सुरू आहे. मात्र रणवीरला वेळ नसल्यामुळे तो पुढच्या वर्षी या सिक्वेलमध्ये काम करू शकतो. हे पूर्ण वर्ष रणवीर सिंह ८३ चित्रपटाला देणार आहे. या चित्रपटाची तयारी, शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शनमध्येच त्याचे हे वर्ष जाणार आहे. यामुळे त्याला वेळ नाही. त्यामुळे त्याच्या सिक्वेलचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे 'गली बॉय' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहणाऱ्यांना अजून आणखी वाट पाहावी लागणार आहे.
मुंबई नव्हे, तर इतर शहरावर आधारित असेल कथा...
या चित्रपटाच्या पुढच्या भागाची कथा मुंबईऐवजी दुसऱ्या एका शहरावर आधारित असेल. याची माहिती चित्रपटात रणवीरचा मित्र एमसी शेरची भूमिका साकारणाऱ्या सिद्धांत चतुर्वेदीने दिली. सिद्धांतने सांगितले, याचा दुसरा भाग कधी येईल माहिती नाही. याविषयी तर स्वत: झोया सांगेल. मात्र इतके नक्की की, याचा दुसरा भाग मुंबईवर आधारित नसेल. तो मुंबईच्या बाहेर असेल किंवा इतर शहरावर आधारित असेल. कारण आपल्या देशात अशा प्रकारची प्रतिभा प्रत्येक शहरात आहे.
स्पिन ऑफच्या चर्चेला सिद्धांतने नाकारले...
चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सिद्धांतचे पात्र एमसी शेरचे स्पिन ऑफ होऊ शकते. कारण 'गली बाॅय'मध्ये हे पात्र पूर्णपणे समाेर आले नव्हते तरीदेखील लोकांनी त्याचे कौतुक केले. ते लाेकांना आवडले. याविषयी सिद्धांत म्हणाला, खरं तर सर्वांसोबतच मजा येत असते. जगातही दुसऱ्या भागाला पहिल्यासारखे प्रेम मिळत नाही. उदाहरण पाहिले तर हॉलीवूड चित्रपट 'अव्हेंजर्स: एंड गेम' ला जितका प्रतिसाद मिळाला तितका त्याचा दुसरा भाग 'स्पायडरमॅन : फॉर फ्रॉम होम' ला मिळाला नाही.
- 02 चित्रपटात काम केले आहे झोया आणि रणवीरने
- 140 कोटी कमावले 'गली बॉय' ने भारतीय बाजारात
- रणवीर यात नफा घेणार असल्याची चर्चा होती, मात्र तो घेणार नाही.
दीपिकासोबत रणवीरदेखील करणार निर्मिती...
रणवीरच्या आगामी ८३ चित्रपटाविषयी चर्चा आहे की, तो याचा सहनिर्मातादेखील आहे. खरं तर डझनभर कलाकार, वेगवेगळे लोकेशन्सचे शूटिंग आणि प्रोस्थेटिकपासून ते व्हीएफएक्समुळे चित्रपटाचे बजेट वाढले आहे. त्यामुळे रणवीर आणि दीपिका या चित्रपटाची सहनिर्मिती करत आहेत. दोघांच्या व्यतिरिक्त मधू मंटेना आाणि रिलायन्सदेखील यात निर्माते आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.