आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणा दग्गुबती पाहून चिंतेत पडले फॅन्स, एकाने लिहिले - 'तुला पाहून भीती वाटते आहे..' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'बाहुबली' चित्रपटातील भल्लालदेव म्हणजेच राणा दग्गुबतीने सोशल मीडियावर एक प्रमोशनल पोस्ट शिकार केली आहे. ज्यामध्ये तो खूप कमजोर दिसत आहे. त्याची अवस्था पाहून सोशल मीडियावर असलेल्या त्याच्या फॅन्सने चिंता व्यक्त केली आहे. एका यूजरने त्याला प्रश्न केला आहे. "सर काय झाले ? तुम्ही एवढे सडपातळ का दिसत आहात ? आणखी एका यूजरची कमेंट आहे. "तुम्ही कसे आहात ? सर्व काही ठीक आहे ना ?" एका यूजरने लिहिले, "तुम्हाला काय झाले ? एवढे स्किनी का दिसत आहात ? तुम्हाला या अवस्थेत पाहून भीती वाटते आहे." अनेककन्नी तर तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थनाही केली.  

चित्रपटासाठी राणाने कमी केले वजन... 
रिपोर्ट्सनुसार, राणा एवढा सडपातळ होण्याचे कारण कोणताही आजार नाही तर त्याचा आगामी चित्रपट आहे. सांगितले जात आहे की, तो सध्या साई पल्लवीसोबत तेलगु चित्रपट 'विराटा प्रवम 1992' ची तयारी करत आहे. यासाठीच त्याने आपले वजन कित्येक किलोने कमी केले आहे. चित्रपटाचे शूटिंग जूनमध्ये सुरु झाले आहे. 

'विराटा प्रवम' व्यतिरिक्त राणाने अशातच 'हाथी मेरे साथी' चे शूटिंग पूर्ण केले आहे. ज्यामध्ये तो बनदेव या भूमिकेत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलगु आणि हिंदीमध्ये रिलीज होणार हे. त्याच्या इतर आगामी चित्रपटांमध्ये 'हाउसफुल 4' आणि 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' देखील सामील आहेत.