• Home
  • Gossip
  • Farah Khan asked Malaika : 'Who has taken this photo?' Arjun Kapoor's name was taken by Fans

सेलेब लाइफ / मलायकाचा अंडरवॉटर फोटो पाहून फराह खानने विचारला प्रश्न - 'हा फोटो कुणी काढला आहे ?' फॅन्सने घेतले अर्जुन कपूरचे नाव 

मालदीव फोटोजवरदेखील फराहने घेतली फिरकी... 

दिव्य मराठी वेब टीम 

Apr 29,2019 03:25:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : फराह खान बॉलिवूड सेलिब्रिटीजची फिरकी घेतच राहते. अवॉर्ड फंक्शन, रियलिटी शोज किंवा सोशल मीडिया असो फराह खान नेहमी आपल्या मित्रांची मज्जा घेत असते. अशातच जेव्हा मलायका अरोराने अंडरवॉटर बिकिनी फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला तेव्हा फराहने तो पाहून विचहरले हा फोटो कुणी क्लिक केला आहे ? फराहच्या प्रश्नाला मलायकाने काहीही उत्तर दिले नाही पण लोकांनी कमेंट बॉक्समध्ये अर्जुन कपूरनाव लिहिले.

मलायकाने टाळले उत्तर...
फराहच्या प्रश्नावर मलायकाने केवळ स्माइली एमोजी बनवून 'कमीनी' लिहिले. पण त्यानंतर तिच्या फोटोवर लोकांनी खूप कमेंट केल्या आणि प्रत्येकजण केवळ अर्जुनचेच नाव घेत होता. कारण हा फोटो पाहून वाटत आहे की, तो तिच्या आणि अर्जुनच्या मालदीव वेकेशनचा फोटो आहे.

मालदीव फोटोजवरदेखील फराहने घेतली फिरकी...
हे पहिल्यांदा नाही जेव्हा मलायकाच्या फोटोवर फराह खानने अशी कमेंट केली आहे. सर्वानाच माहित आहे की, मालदीवमध्ये मलायका अर्जुनसोबत होती. जेव्हा मालदीवमधून या दोघांचे फोटोज समोर आले होते तेव्हा फराहने फोटोजला पाहून असाच प्रश्न विचारला होता.

अर्जुन-मलायका लपवत नाहीत आपले नाते...
हे दोघे आता आपले नाते इतरांपासून लपवू इच्छित नाहीत. अनेकदा हे दोघे एकमेकांसोबत स्पॉट होतात. मागच्यावर्षी दोघांच्या नात्याबद्दल कन्फर्मेशन मिळाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्या होत्या पण आता त्यावर पूर्णविराम लागला आहे.

X
COMMENT