आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MeToo रिअॅक्शन / भाऊ साजिदवर लागलेल्या आरोपांनंतर फराह खान म्हणाली, \'साजिद तू चुकलास मी तुझ्या नाही, छळ झालेल्या मुलींच्या बाजूने\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक साजिद खानवर सुरू असलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपानंतर पहिल्यांदाच त्याची बहीण आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर-दिग्दर्शिका फराह खान हिने प्रतिक्रिया दिली आहे. मी साजिदच्या वागण्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही, मी त्या प्रत्येक महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे फराह खानने म्हटलं आहे. नेहमीच आपल्या भावाच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या फराह खानने आता साजिदच्या कृत्याची ट्विटरवर निंदा केली आहे.

This is a heartbreaking time for my family.We have to work through some very difficult issues. If my brother has behaved in this manner he has a lot to atone for.I don’t in any way endorse this behavior and Stand in solidarity with any woman who has been hurt.

— Farah Khan (@TheFarahKhan) October 12, 2018

 

महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री सलोनी चोप्रा या दोघींनी साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या ट्विटर पोस्टद्वारे त्यांनी साजिद खानची विकृती आणि महिलांप्रती असलेले त्याचे असभ्य वर्तन जगासमोर आणले होते. त्यानंतर फराह खानने ट्विट करत साजिदच्या वर्तनावर जाहीर टीका केली आहे. जे काही आरोप सुरू आहेत त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना खूपच दु:ख झाले आहे. माझे कुटुंब मानसिक धक्क्यातून जात आहे. जर माझ्या भावाने अशा प्रकारे असभ्य वर्तन केले असेल तर त्याला याची शिक्षा भोगावीच लागेल. माझ्या भावाच्या कोणत्याही कृतीचे मी समर्थन करत नाही. मी त्या प्रत्येक महिलेच्या पाठीशी उभी आहे, असे फराहने ट्विट करुन म्हटले आहे.

 

बिपाशाने केले तनुश्रीचे कौतुक...
अभिनेत्री बिपाशा बासू हीने साजिदवर आरोप केले आहेत. साजिद दिग्दर्शन करत असलेल्या ‘हमशकल’ चित्रपटाच्या सेटवर महिलांसाठी अपमानजनक वातावरण असायचे असे तिने म्हटले आहे. त्याच्या या वागण्यामुळे मी 2014 मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनपासून दूर राहीले. परंतु मी चित्रपटातील माझ्या भूमिकेबाबत आनंदी नसल्याची चुकीची चर्चा त्यावेळी केली गेली असेही ती म्हणाली. तिने तनुश्री दत्ताचेही आभार मानले आहेत. बिपाशा म्हणाली की, तनुश्रीमुळे इतर महिलाही त्यांच्यासोबत झालेल्या अन्यायाला आता वाचा फोडत आहेत.

 

Kudos to #tanushreedutta 🙏...because of her so many women have the courage to speak out against these men who take advantage of women ...owing to their fame, power and clout.

— Bipasha Basu (@bipsluvurself) October 12, 2018

 

शेअर केले साजिदशी निगडीत अनुभव.. 

बिपाशा म्हणते, साजिदच्या वागण्यामुळेच आपण चित्रपटाशी निगडित गोष्टींपासून दूर राहण्याचे ठरवले. तो सेटवर कायमच महिलांविषयी अतिशय वाईट विनोद करतो. तसेच तो सर्वच मुलींबाबत उद्धट वागतो असा आरोपही तिने केला. पण आपल्याला त्याच्याकडून थेट अशाप्रकारचा त्रास कधीही देण्यात आला नाही असेही तिने स्पष्ट केले. त्याच्या अशा चुकीच्या वागण्यानेच मी चित्रपटाशी निगडित गोष्टींपासून दूर राहील्याचे सेटवरील अनेकांना माहित होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...