आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनील ग्रोवरच्या टीमवर नाराज आहे फराह खान? सेटवर तासंतास प्रतिक्षा करणे पडतेय महागात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. फिल्ममेकर आणि कोरियोग्राफर फराह खान सध्या सुनील ग्रोवरच्या 'कानपुर वाले खुरानाज' या शोमध्ये दिसतेय. एका रिपोर्ट्सनुसार ती शोच्या टीमवर आनंदी नाही. कारण सेटवर ते अनेक तास तिला फ्री बसावे लागते. सूत्रांनुसार, "शूटिंग शेड्यूलनुसार, टीम 12 तासांच्या शिफ्टमध्ये 2 एपिसोड शूट करते. पण दुर्दैवाने, प्री-प्रोडक्शन टीम तयारी न करताच सेटवर येते, यामुळे फराहला शूटिंगसाठी 4-5 तास प्रतिक्षा करावी लागते. यामुळे ती टीमवर खुप नाराज आहे."

 

पहिल्या एपिसोडमुळे दूसराही होतो लेट
- सूत्रांनुसार, "प्री-प्रोडक्शन टीमच्या अर्धवट तयारीमुळे पहिल्या एपिसोडच्या शूटिंगला उशीर होतो. यामुळे दूस-या एपिसोडच्या शूटिंगलाही लेट होते. म्हणजेच जर फराहची वेळ दुपारी 12.30 ची असेल तर स्क्रिप्टिंग, रिहर्सल आणि कलाकारांच्या प्लेसमेंटसोबतच सर्व गोष्टींना सेट करेपर्यंत त्यांना 5 वाजेची वाट पाहावी लागते."

 

घरात मुलं करतात प्रतिक्षा
- सेटवर टीमच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळे फराहच्या खासगी आयुष्यावर परिणाम होतोय. कारण रोज-रोज तिच्या मुलांना घरी प्रतिक्षा करावी लागते. तसे, स्टारकास्टसोबत तिची बॉन्डिंग चांगली आहे. तिच्यासोबत दूस-या कलाकारांनाही या अडचणीचा सामना करावा लागतोय. यामुळे फराहजवळ शोवर काम करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. या प्रकरणी फराह खानची कोणतीच रिअॅक्शन समोर आलेली नाही. फराह शोमध्ये सुनील ग्रोवहच्या शेजारी सेलिब्रिटीची भूमिका साकारत आहे. सुनील तिच्यासोबत फ्लर्ट करताना दिसतो.

 

बातम्या आणखी आहेत...