आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायबरेलीत फरक्का एक्सप्रेसला भीषण अपघात, 7 जण ठार तर 21 जखमी, 9 डबे रुळावरून घसरले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायबरेली - उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधील हरचंदपूरजवळ न्यू फरक्का एक्सप्रेस पटरीवरून घसरल्याने अपघात झाला आहे. हा अपघात सकाळी 6 वाजेच्या सुमारास झाला. अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 50 जण जखमी असल्याची माहिती मिळतेय. जखमींची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात रेल्वेचे 9 डबे पटरीवरून घसरल्याची माहिती मिळाली आहे. 


पहाटे सहा वाजेच्या सुमारास हरचंदपूर रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर मालदा टाऊनहून नवी दिल्लीला जाणारी 14003 न्यू फरक्का एक्सप्रेसच्या 9 बोगी रुळावरून खाली घसरल्या. ट्रेनच्या इंजिन सहित 3 जनरल कोच पूर्णपणे पलटी झाले तर 5 स्लिपर कोच रुळावरून खाली उतरले. 

 

एक निलंबित...

हाती आलेल्या माहितीनुसार रेल्वेला पास होण्यासाठी सिग्नल देण्यात आला, पण पुढे रेल्वेचे रूळ जोडण्याचे काम करण्यात आले नव्हते. त्यामुळे रेल्वेच्या बोगी एकापाठोपाठ खाली घसरत पलटी झाल्या. हरचंदपूरचे असिस्टंट स्टेशन मास्टर आशिष कुमार हे प्राथमिक तपासात दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

 

मदत जाहीर..
अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेबाबत माहिती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक प्रमुख अधिकारी लगेच घटनास्थळी रवाना झाले. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाला सूचना देण्यात आल्या. सीएम योगी यांनी नुकसान भरपाईची घोषणाही केली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2-2 लाख तर जखमींना 50-50 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

 

 

मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक

New Farakka Express train derailment in #Raebareli: Emergency helpline no. set up at Deen Dayal Upadhyaya Junction-BSNL-05412-254145
Railway-027-73677. Emergency helpline numbers set up at Patna Station -
BSNL-0612-2202290, 0612-2202291, 0612-220229, Railway Phone No.- 025-83288

— ANI (@ANI) October 10, 2018

#Raebareli : Drones & long-range cameras are being used to monitor the situation at the site of New Farakka Express Train derailment. 7 people died and 21 injured in the accident, pic.twitter.com/bB9mKdy6N9

— ANI UP (@ANINewsUP) October 10, 2018

#SpotVisuals: Rescue and relief operations are underway at the spot where 9 coaches of New Farakka Express train derailed in #Raebareli. 7 people died in the accident, 21 injured. pic.twitter.com/JwukreeWVY

— ANI UP (@ANINewsUP) October 10, 2018

 

बातम्या आणखी आहेत...